श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पंढरपूर प्रशालेमध्ये ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर,संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते ता.पंढरपूर प्रशालेमध्ये ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य ए.एम बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रशालेतील मुलींनी राष्ट्रगीत व ध्वजगीताचे समुह गायन केले. सामुदायिक संविधान उद्देशिकेचे वाचन करुन अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली.देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती असून त्यांनी सत्य,सदाचार आणि अभ्यासू वृत्तीने मार्गक्रमण करुन आपल्या छोट्या छोट्या कृतीतून आपण आपली देशभक्ती व्यक्त करु शकतो असे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.

प्रशालेतील विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा दत्तात्रय चौधरी हीने नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ओशो क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले त्याबद्दल हार,शाल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते तीचा व मार्गदर्शक शिक्षक गणेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला.तसेच महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालय,मुंबई यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय एलिमेंटरी, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये यावर्षीही उज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली असून प्रशालेचा ग्रेड परीक्षांचा निकाल १००% लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्रीकांत चंदनशिवे यांचाही सन्मान करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार व खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र जाधव यांनी केले.

यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक रणजित शिनगारे,विलास दराडे, सुरेश कट्टे,धनंजय भाजीभाकरे,जैनुद्दीन शेख,महेश देशमुख, दत्तात्रय वाघ,नितीन वायदंडे,श्रीकांत चंदनशिवे,प्रथमेश गावडे,नवनाथ लोणकर,

श्रीराम खूपसे,गणेश पाटील,

गणेश खिलारे,बबन कोकतरे,सविता इंगळे,

जावीर,धनाजी देठे, समाधान शेजाळ,विष्णू घोगले,संदीप चौधरी, राजाराम घोडके,विजय पंडीत,रोहीत हेंबाडे, सरस्वती शिंदे,सुभाष देवकर,बबन पवार, बाळू बनसोडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी व प्रतिष्ठीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.