तालुक्यातील प्रत्येक बालकाची तपासणी होण्यासाठी आरोग्य विभागाचे सूक्ष्म नियोजन

 40 आरोग्य वैद्यकीय तपासणी पथकाची स्थापना

तालुक्यातील प्रत्येक बालकाची तपासणी होण्यासाठी  आरोग्य विभागाचे सूक्ष्म नियोजन

तालुक्यातील प्रत्येक बालकाची तपासणी होण्यासाठी

आरोग्य विभागाचे सूक्ष्म नियोजन

 गटविकास अधिकारी -प्रशांत काळे

 40 आरोग्य वैद्यकीय तपासणी पथकाची स्थापना

  पंढरपूर दि.(09):- ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियानांतर्गत तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील बालके व मुलांची आरोग्य तपासणी आज दिनांक 9 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली असून, या अभियानांतर्गत बालकाचे आरोग्य तपासणी होण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याची माहिती गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.

   आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाकांक्षी आरोग्य तपासणी मोहीम तालुक्यात राबविण्यात येणार असून, या अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालके व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय निमशासकीय शाळा, खाजगी शाळा, अंगणवाडी, दिव्यांग शाळेतील विद्यार्थी यांच्यासह अनाथ आश्रम, समाज कल्याण वसतिगृह तसेच ऊसतोड विटभट्टी आदी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या शाळाबाह्य बालकांचीही तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 40 आरोग्य वैद्यकीय तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी यावेळी दिली.

     या अभियानांतर्गत तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील 1 लाख 40 हजार बालकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करण्यात येणार आहेत. तर गरजू आजारी बालकांवर औषध उपचार करून शस्त्रक्रिया व प्रतिबंधात्मक आरोग्य व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तक्षय, डोळ्यांचे, आजार गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा आधी अन्य आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशनही करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले.