उद्याचे खंडग्रास सूर्यग्रहण असे असणार पहा

* हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे.

उद्याचे खंडग्रास सूर्यग्रहण असे असणार पहा

खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त)*मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 - अश्विन वैद्य अमावस्या*

*★पुण्यकाल :-* हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे.म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल,त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही.म्हणून आपल्या गावाच्या ग्रहण स्पर्श कालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.
*★ग्रहणाचा वेध:-* हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने *मंगळवारच्या पहाटे ३.३० वा.पासून सूर्यास्तापर्यंत* ग्रहणाचा वेध पाळावा. बाल,वृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी *मंगळवारी दुपारी १२.३० वा.पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत.* वेधामध्ये भोजन करू नये,स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इ. करता येतील,तसेच पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग करता येईल.मात्र ग्रहण पर्वकालात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
*★राशीपरत्वे फल:-* वृषभ,सिंह,धनु,मकर या राशींना शुभफल;
मेष,मिथुन,कन्या,कुंभ या राशींना मिश्रफल;
कर्क,तुला,वृश्चिक,मीन या राशींना अनिष्ट फल आहे.ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.

*गावे*       *स्पर्श*     *मोक्ष*
अ.नगर.   १६:५०.  १८:३१
पुणे         १६:५१.  १८:३१
नाशिक.   १६:४७.  १८:३१
मुंबई.       १६:४९.  १८:०८
सातारा     १६:५४.  १८:३१
सोलापूर.  १६:५६   १८:३०
बीड.        १६:५२.  १८:३०
बारामती   १६:५३. १८:३१
पंढरपूर.    १६:५५. १८:३०
परभणी    १६:५२.  १८:३०
अमरावती १६:४८. १८:२९  *संदर्भ :-श्री दाते पंचांग
 वरील वेळा ह्या मी ठराविक गावांच्या दिलेल्या आहेत.तरी *सर्वसाधारणपणे सायं.४:४५ ते सायं.६:३२ हा ग्रहण काल आहे.*