क्रिकेट खेळताना चेंडू लागून मृत्यू झाल्याचे अखेर मृत्यूचे गुड उकले.

हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

क्रिकेट खेळताना चेंडू लागून मृत्यू झाल्याचे अखेर मृत्यूचे गुड उकले.

क्रिकेट खेळताना चेंडू लागून मृत्यू झाल्याचे अखेर मृत्यूचे गुड उकले

पंढरपूर दि. 8 ऑगस्ट शनिवार दि. 6 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील मान नदीच्या पात्रात क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून मृत्यू झाल्याची बातमी पंढरपूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली होती.

सोशल मीडिया आणि प्रसिद्ध माध्यम आणि क्रिकेट खेळत असताना गुप्तांगाला चेंडूचा जबर फटका बसल्यानेच तो क्रिकेट खेळणारा विक्रम रमेश शिरसागर याचा मृत्यू झाला आहे हेच सर्वांच्या मनात डोक्यात तयार झाले होते.

ही बातमी सगळीकडे पसरल्याने क्रिकेट खेळाडूंच्या अनेक मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असणार त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबातील लोकांच्याही मनात पाल चुकू चुकू लागली आणि अशा बाबतीत गंभीर समस्या मनामध्ये उभारू लागल्या. परंतु क्रिकेट या खेळाला देशात व पर प्रांतात एक राष्ट्रीय क्रीडा खेळ म्हणून सर्व देशांमध्ये अवल स्थानाने मानले जाते. क्रिकेटचा राजा म्हणून ओळखले जाणारे तेंडुलकर यांनी वयाची 18 वयापासून ते वयाच्या 55 ते60 वयापर्यंत क्रिकेट खेळले आहेत.

आज पर्यंत इतिहासात कधीच असे झाले नाही की क्रिकेट खेळत असताना चेंडू लागून क्रिकेट खेळाडूचा चा मृत्यू झाला आहे. जर असे क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागून मृत्यू झाला आहे खेळाडूंच्या मनामध्ये किंवा तरुण युवक पिढीच्या मनामध्ये घर करून राहिले तर क्रिकेट खेळण्यास कोणी तयार होणार नाही. क्रिकेट खेळाडू तयार होणारे तयार होणार नाही आणि क्रिकेट खेळ हा कमी होत जाईल तेव्हा अशी भीती कोणीही खेळाडूंनी बाळगू नये यासाठी वरील सर्व बाबींचा आम्ही विचार केला असता नेमका मृत्यू कोठे कसा कोणत्या कारणाने झाला याबद्दल सविस्तर माहिती घेतली असता मृत्यू झालेल्या विक्रम शिरसागर सोबत असणाऱ्यांचा शोध घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळीही प्रत्यक्षपणे उकल करण्यात आली. तालुक्यातील तावशी येथील लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 वी जयंती निमित्त तावशी येथील अण्णाभाऊ साठे प्रेमी मंडळी यांनी या निमित्ताने क्रिकेट स्पर्धा घेण्याचे आयोजन केले होते. त्यावेळी या स्पर्धेमध्ये मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव यांच्यासह पाच सहा गावातील तरुण क्रिकेट खेळाडूनी सहभाग घेतला होता. तावशी येथील मान नदीच्या कोरड्या नदीपात्रात क्रिकेटच्या मैदानावर दुपारच्या वेळी नेपतगाव व आंधळगाव यांचा क्रिकेट सामना रंगला होता. यावेळी मृत्यू पावलेला विक्रम हा बॅटिंग करत होता तर आंधळगाव येथील क्रिकेट खेळाडू बॉलिंग करत होता त्याचवेळी विक्रमला अस्वस्थ व बेचैन वाटू लागले आणि त्याचा चेंडू दोन-तीन वेळा हुकला मात्र तिसरा चेंडू पुन्हा त्याच्याकडून हुकून तो त्याच्या गुप्तांगावर लागला त्यावेळी तो थोडा वेळ थांबून राहिला आणि थोड्या वेळाने तो पुन्हा क्रिकेट खेळण्यास तयार झाला. त्यानंतर थोडावेळ क्रिकेट ही खेळला परंतु त्याला शारीरिक त्रास होतच होता पुन्हा तो एकदम अस्वस्थ झाल्याने त्याला तावशी येथील खासगी डॉक्टरांकडे सोबतचे सहकारी व तेथील लोकांनी घेऊन गेली त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याचा बीपी चेक केला प्रथमोपचार केला आणि त्या .डॉक्टरांनी विक्रम क्षीरसागर यास पंढरपूरला दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे विक्रम चे सहकारी लागलीच असणाऱ्या चार चाकी गाडीतून ताबडतोब पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्या अगोदरच लाईफ लाईन येथे डॉक्टर शिरसागर या ठिकाणी कार्यरत आहेत मृत्यू पावलेल्या विक्रम चे चुलत भाऊ हेच तेथे असल्याने विक्रमच्या सहकारी यांनी त्यांना मोबाईल वरून संपर्क साधला आणि आम्ही विक्रमची तब्येत प्रकृती बिघडली आहे. तुमच्याकडे उपचारासाठी घेऊन येत आहोतअसे सांगितले विक्रम क्षीरसागर हा डॉ. क्षीरसागर यांच्या जवळचाच नातेवाईक असल्याने तेही तेथे विक्रम वर उपचार करण्यासाठी तयारीत राहिले .त्यावेळी वेळ होती दुपारचे अडीच ते तीन वाजण्याचे सुमारास विक्रमला दवाखान्यात घेऊन पोचली आणि लाईफ लाईन हॉस्पिटलचे आय सी यू व उपचारासाठीअत्याधुनिक सुविधा तिसऱ्या मजल्यावर असल्याने विक्रम यास दवाखान्याच्या लिफ्ट मधून सोबत असणारे सहकारी घेऊन जात असताना विक्रम ची एकदम प्रकृती खालावली आणि शरीर प्रतिसाद देत नाही हे डॉक्टर शिरसागर व त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या लक्षात आले परंतु त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. त्यावेळी डॉक्टर सिरसागर व त्यांचे सहकारी डॉक्टर यांच्या लक्षात आले की हा हृदय विकाराचा झटका असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. परंतु त्यावेळी विक्रम हा आखेरचा श्वास घेत होता .अर्ध्या तासाने डॉक्टरांनी सांगितले की विक्रमची प्राणज्योत मावळली आहे. उपचार करणारे उपस्थित डॉक्टरांनी विक्रम चा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. त्यानंतर येथील पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवून देण्यात आले. पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी विक्रम क्षीरसागर यांचा मृत्यू प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे सांगितले.