सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये गजब लग्नाची अजब कहानी

आयटी-इंजिनिअर-असणाऱ्या-दोन-जुळ्या-बहिणीने-एकाच-तरुणाशी-लग्न-केले.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये गजब लग्नाची अजब कहानी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये गजब लग्नाची अजब कहानी

आयटी इंजिनिअर असणाऱ्या दोन जुळ्या बहिणीने एकाच तरुणाशी लग्न केले.

महाराष्ट्रातील दोन उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केला असून या विवाहाची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. या दोन्ही जुळ्या बहिणी कांदिवलीतील असून त्यांनी टॅक्सी ट्रॅव्हलची एजन्सी असलेल्या तरुणाशी विवाह केलाय. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचे तरुणावर प्रेम जडले. त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने दोघींनी त्याच्याशी एकाच मांडवात लग्न केलं.

पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आयटी इंजिनिअर असून एकाच कंपनीत काम करतात. तर त्यांनी विवाह केलेला तरुण अतुल हा अंधेरीत राहतो. पिंकी रिंकी आणि अतुलच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हॉटेल गलांडे इथं मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून त्यांच्या सवयीसुद्धा एकसारख्या आहेत. इतकंच काय तर एकीला त्रास झाल्याच तो दुसरीलासुद्धा जाणवतो. याशिवाय त्यांची आवडन निवडही एकच आहे.

 सहा महिन्यांपूर्वी पिंकी रिंकीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिंकी आणि रिंकीच्या घरी इतर कोणी पुरुष नसल्याने तेव्हा अतुलने त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी मोठी मदत केली. तेव्हा दोघींपैकी एकीचे अतुलवर प्रेम जडले. पण दोघी वेगळ्या राहू शकत नसल्याने दोघींनीही त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 सहा महिन्यांपूर्वी पिंकी आणि रिंकीची आई आजारी पडली होती. उपचारासाठी पिंकी, रिंकीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा अतुलने त्यांच्या आईची रुग्णालयात काळजी घेतली होती. रुग्णालयात आईची काळजी घेणाऱ्या तरुणाच्या या प्रेमात एक बहिण पडली. यानंतर दोघींनीही नातेवाईकांच्या संमतीने अतुलसोबत माळशिरसमध्ये एकाच मांडवात लग्न केलं.