महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक मंत्री शंभूराजे देसाई

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज रुग्णालय गाठत महेश गायकवाड यांची भेट

महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक मंत्री शंभूराजे देसाई

आ. गणपतराव गायकवाड यांनी गोळ्या झाल्याचे प्रकरण

महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक मंत्री शंभूराजे देसाई

शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज रविवारी (4 फेब्रुवारी) मंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना बोलताना दिली.

कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणातील मुख्य आरोपी आमदार गणपत गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहेत. याचदरम्यान आमदार गणपत गायकवाड यांच्यावर आता Atrocityअंतर्गत गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे येत असतानाच शिंदे गटातील मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज रुग्णालय गाठत महेश गायकवाड यांची भेट घेतली.