युवा पिढीने थोर महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घ्यावा.आ. प्रशांतराव परिचारक.

भटुंबरे येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

युवा पिढीने थोर महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घ्यावा.आ. प्रशांतराव परिचारक.

भटुंबरे येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

युवा पिढीने थोर महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घ्यावा.आ. प्रशांतराव परिचारक.

पंढरपूर दिनांकऑगस्ट साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

याप्रसंगी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवाने आपल्या शाहीरीतून समाजाचे परिवर्तन करून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. पूर्वीच्या काळात अनेक महापुरुषांनी बलिदान केले होते. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्याच्या कालखंडात शाहीरीच्या माध्यमातून जनजागृती केली त्यावेळी काही समाजाने इतर समाजाला गावकुसाबाहेर टाकले होते त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. तसेच त्यांना आरक्षण संरक्षण दिले स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे आयुष्य घडवण्याची ताकद दिली साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जनजागृती केली आशा महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन युवा पिढीने आदर्श बनले पाहिजे असा संदेश यावेळी आम.प्रशांतराव परिचारक यांनी युवा पिढीला दिला आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक फंचीराम शिंदे, सरपंचाचे चिरंजीव गणेश ढवळे, शिवाजी तावसकर, अजयसिह खांडेकर, भारत शेंबडे, भीमराव शिंदे

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक पंडित शेंबडे, पोपट शिंदे समाधान शिंदे, प्रमोद काळेबाग तसेच अण्णाभाऊ साठे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाधान गायकवाड प्रधान वाघमारे, महादेव आडगळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.