सोलापुरात पंधरा हजाराची लाच मागणारा पोलीस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस नाईक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

सोलापुरात पंधरा हजाराची लाच मागणारा पोलीस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सोलापुरात पंधरा हजाराची लाच मागणारा पोलीस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सोलापूर : वाळू चोरीची कारवाई न करण्यासाठी व तहसीलदारांना अहवाल न पाठवण्यासाठी वीस हजाराची लाच मागून तडजोडीअंती पंधरा हजार रुपये घेण्याचे ठरवलेल्या पोलीस नाईक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. दत्तात्रय रामचंद्र कांबळे, नेमणुक सलगरवस्ती पोलीस स्टेशन, सोलापूर शहर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे मौजे कवठेगाव येथे घराचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी लागणारी वाळू तक्रारदार यांनी त्यांच्या भावाच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकली होती. दि 07.07.2023 रोजी आरोपी लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदार यांचे भावास सदरची वाळू चोरीची आहे तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करतो असे म्हणून तक्रारदार यांच्या भावास पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर सदर प्रकरण मिटवण्यासाठी 20,000 रु लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि.07.07.2023 रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदार व त्यांच्या भावाविरुद्ध वाळू चोरीची कारवाई न करण्यासाठी व तहसीलदार यांना वाळू चोरीबद्दल अहवाल न पाठवता, त्याबदल्यात सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याचा 283 प्रमाणे भाग 6 ची कारवाई करून प्रकरण मिटवून टाकतो असे सांगून 15000 रु लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोह प्रमोद पकाले, पोना श्रीराम घुगे, पोना स्वामीराव जाधव, पोना अतुल घाडगे, पोना संतोष नरोटे, चालक पोह राहुल गायकवाड सर्व ने. अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर यांनी केली.