शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे                                               

प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट, 

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे                                               

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे                                                                                    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट, 

सोलापूर, दि.12(जिमाका):- राज्यात शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तरी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून आपल्या विभागास लाभार्थी निवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे व हा कार्यक्रम यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

          तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शंभरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन श्रवण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 संतोष देशमुख, महसूल तहसीलदार दत्तात्रय मोहोळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव व अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, शासन आपल्या दारी अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजित असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंतिम तारीख लवकरच निश्चित होणार आहे. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या अधिनिस्त तालुकास्तरीय प्रमुख व त्यांचे कर्मचारी गावोगावी जाऊन शासकीय योजनांच्या त्यांची निवड करण्याबाबत कळवावे व लाभार्थी निवड यादी पुढील पंधरा दिवसात प्रशासनाला सादर करावी, असे त्यांनी निर्देशित केले. 

       प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी "शासन आपल्या दारी" ह्या अभियानाबद्दल माहिती दिली. हे अभियान राज्यात दिनांक 15 एप्रिल 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तसेच या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्याला 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे किमान उद्दिष्ट दिलेले असून प्रशासनाकडून एक ते दीड लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

       त्याप्रमाणेच सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यांना देण्यात आलेले 12 हजाराचे उद्दिष्ट शासकीय कार्यालयांना ठरवून द्यावे व मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या लाभार्थ्यांची नावाची यादी तात्काळ तयार करावी. सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्याकडील तालुकास्तरीय अधिकाऱ्याकडून लाभार्थी निवडीचे काम वेळेत पूर्ण करून घ्यावे, असे श्रीमती पवार यांनी सूचित केले.