सोलापूर लोकसभेसाठी मा खा. अमर साबळे यांनाच उमेदवारी द्यावी.

सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे यांच्या नावाची चर्चा सुरू

सोलापूर लोकसभेसाठी मा खा. अमर साबळे यांनाच उमेदवारी द्यावी.

सोलापूर लोकसभेसाठी मा खा. अमर साबळे यांनाच उमेदवारी द्यावी. सोलापूर जिल्ह्यातील जनतेची मागणी.

सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे यांच्या नावाची चर्चा सुरू.

पंढरपूर दि .25 फेब्रुवारी विशेष प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसतसे सर्वच पक्षातील मातबर राजकीय नेते येणाऱ्या लोकसभा निवडणुकी साठी उमेदवारी आपल्यालाच मिळावी याबद्दल शर्तीचे प्रयत्न सध्या सगळीकडे सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक जण लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु सध्या तरी माजी खासदार भाजपाचे उपाध्यक्ष अमर साबळे यांच्या उमेदवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातून जनतेतून मागणी होत असल्याने साबळे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.

 अमर साबळे हे भाजपचे कमांडर प्रमुख अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे खंदे समर्थक विश्वासू म्हणून अमर साबळे यांना ओळखले जाते. त्याचबरोबर अमर साबळे हे भाजपचे उपाध्यक्ष व राज्य सभेचे खासदार असताना त्यांनी केंद्रीय विविध कमेटीवर चांगले उत्कृष्ट असे काम केलेले आहे त्यामुळे त्यांचा राजकीय अभ्यासचा फार मोठा अनुभव असल्यामुळे साबळे यांनी संसदेच्या अधिवेशनात 480 प्रश्न उपस्थित करून विचारना केली होती.असे एकमेव खासदार म्हणून त्यांचा संसदेत चांगला परिचय आहे. जनसामान्य नागरिकांच्या हकेला धावून जाणारे अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे व्यक्तिमत्व अमर साबळे यांच्यात आहे . तसेच अमर साबळे यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि ग्रामीण खेड्यापासून राजधानी पर्यंत एक चांगला राजकीय नेतृत्व असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सोलापूर जिल्ह्याचा मागील 10 वर्षापासून रखडलेल्या विकास कामाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच तरुण युवक युवती यांची वाढलेली बेकारी हटविणे व त्यांच्या हाताला काम देऊन उद्योग व्यवसाय वाढवेल त्यांची उन्नती कशी होईल त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन कशी प्रगती करता येईल अशा अनेक त्रुटीवर मात करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा दावेदार चाणक्य अभ्यासू व उत्कृष्ट चांगले नेतृत्व म्हणून ठसा असणारे भाजपचे अमर साबळे यांनाच उमेदवारी द्यावी अशी सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेची मागणी होत आहे. त्यामुळे आगामी सोलापूर लोकसभेसाठी निवडणूक उमेदवार म्हणून खा. अमर साबळे यांच्या नावाची चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहे.