दर्शनरांगेतील भाविकास कंत्राटी कर्मचा-यांकडून मारहाण” या मथळयाखाली पुढे काय पहा,
भाविकाची व तेथील बीव्हीजी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी श्री रोहित कुंभार
“दर्शनरांगेतील भाविकास कंत्राटी कर्मचा-यांकडून मारहाण” या मथळयाखाली प्रसारित झालेल्या बातम्यांबाबत,
पंढरपूर दि.07:- आषाढी यात्रा 2025 कालावधी सुरू आहे. त्यामुळे श्रींच्या दर्शनरांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या अनुषंगाने दर्शनरांगेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, दिनांक 07 जुलै रोजी पहाटे 3.30 वाजता वा त्या दरम्यान श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या पदस्पर्शदर्शनरांगेत रिध्दी सिध्दी दर्शनमंडप क्र. 09 मध्ये श्री संजीव कोंडीबा शिवाळे रा. नांदेड या भाविकाची व तेथील बीव्हीजी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी श्री रोहित कुंभार रा. कोल्हापूर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. तद्नंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांनी संबंधित भाविक व सुरक्षा रक्षकास पोलीस स्टेशनमध्ये जबाब - नोंद घेऊन समज देऊन सोडण्यात आले आहे.
पहाटे 3.30 ते 4.00 च्या दरम्यान रिध्दी सिध्दी दर्शनमंडप क्र. 09 मधून श्री संजीव शिवाळे रा. नांदेड हा भाविक दर्शनरांगेतून वॉशरूमला गेला होता व वॉशरूममधून येईपर्यंत त्यांच्यासोबतचे व्यक्ती दर्शनरांगेतून पुढे गेले होते. त्यामुळे सदर भाविकाने दर्शनरांगेतील त्याच्यासोबतच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व त्यामधून सदर भाविक व सुरक्षा रक्षकामध्ये वाद झाला. या भाविकाने वॉशरूमला जाण्यासाठी ज्या ठिकाणातून दर्शनरांगेतून बाहेर आला होता. त्याठिकाणीच पून्हा दर्शनरांगेत प्रवेश करणे आवश्यक असताना, बॅरीकेटींगवरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॅरीकेटींग व बांबूमुळे त्यांना दुख:पत झाली होती. याशिवाय, सदर घटनेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचा जबाब संबंधित भाविकांने पोलीस विभागास दिला आहे. त्याची स्टेशन डायरीला नोंद घेऊन समज देऊन सोडण्यात आले आहे. तसेच बीव्हीजी कंपनीने संबंधित सुरक्षा रक्षकाला सेवेतून कमी केले आहे. तथापि, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची योग्य ती दक्षता घेण्याबाबत समज देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.