मागासवर्गीयांच्या अनुशेष न भरणाऱ्या शिक्षण संस्थाविरुद्ध तात्काळ कारवाई करा

मागासवर्गीयांच्या अनुशेष न भरणाऱ्या शिक्षण संस्थाविरुद्ध तात्काळ कारवाई करा

मागासवर्गीयांच्या अनुशेष न भरणाऱ्या शिक्षण संस्थाविरुद्ध तात्काळ कारवाई करा

मागासवर्गीयांच्या अनुशेष न भरणाऱ्या शिक्षण संस्थाविरुद्ध तात्काळ कारवाई करा - शिवाजीराव जावीर*

सोलापूर-: सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थामध्ये मागासवर्गीय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरला जात नसून मागासवर्गीयांच्या अनुशेष भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण संस्था विरुद्ध तात्काळ कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांनी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना समक्ष भेटून केली .

           गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जावीर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उकिरडे यांची भेट घेतली. यावेळी जावीर म्हणाले की अनेक शिक्षण संस्थाचालकांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या जागेवरती त्यांच्या नात्यातील बिगर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या नेमणूका केल्या असून शिक्षण अधिकारी सोलापूर यांनी देखील त्या sponserd केल्या असून गैरमार्गाने त्यास मान्यता दिलेल्या आहेत.तसेच संस्था चालकांनी ज्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत त्यांना देखील रोस्टर बिंदू प्रमाणे नेमणुका दिल्या नसल्याचे जावीर यांनी उकिरडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

             या शिष्टमंडळामध्ये शिवाजीराव जावीर यांच्या सह अ. भा. रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे, बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय गेजगे ,दीपक आयवळे आदींचा समावेश होता.

          शिष्टमंडळाशी बोलताना सर्व संस्थाचालकांना मागासवर्गीयांच्या अनुशेष भरण्यास भाग पाडू असे आश्वासन उकिरडे यांनी शिष्टमंडळाला दिले.