कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमीवर पंढरपूर शहारातील अतिक्रमण हटाव विशेष मोहिम युद्ध पातळीवर सुरु.

अतिक्रमणे काढण्याबाबत युद्ध पातळीवर विशेष मोहिम हाती

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमीवर पंढरपूर शहारातील अतिक्रमण हटाव विशेष मोहिम युद्ध पातळीवर सुरु.

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमीवर पंढरपूर शहारातील अतिक्रमण हटाव विशेष मोहिम युद्ध पातळीवर सुरु.

पंढरपूर शहरामध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त विविध कामे हाती घेण्यात आलेली असुन येणा-या भाविक भक्तांना चांगली सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले असुन शहरामध्ये येणा-या नागरीकांना व भाविकांना रस्त्यावर चालताना अडथळा होवु नये म्हणुन शहरातील अतिक्रमणे हटविण्याची विशेष मोहिम हाती घेतल्याचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी सांगितले. दि.23/11/2023 रोजी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने अनेक व्यवसायिकांनी फुटपाथ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तसेच भाविकांना रस्त्यावरुन चालताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. म्हणुन पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत युद्ध पातळीवर विशेष मोहिम हाती घेतली असुन चंद्रभागा वाळवंट, महाद्वार घाट, प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार पोलीस चौकी ते नामदेव पायरी ते गोपाळकृष्ण मंदिर, संपुर्ण स्टेशन रोड, गजानन महाराज मठ ते महात्मा फुले पुतळा, व्हिआयपी रोड, 65 एकर, गोपाळपुर रोड दर्शनबारी येथील सर्व अतिक्रमणे काढण्यात येत असुन उपविभागीय़ अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक गजानन गुरव व मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरअभियंता नेताजी पवार, रचना सहा. अभियंता सोमेश धट, सुहास झिंगे, नवनाथ पवार हे अतिक्रमण काढण्याची विशेष मोहिम राबवित आहेत.