पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची रुग्ण  नागरिकांनी मागणी

रुग्णालयाच्या आवारात असणारी पोलीस चौकी अनेक वर्षापासून बंद अवस्थेत धुळखात

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची रुग्ण  नागरिकांनी मागणी

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची रुग्ण  नागरिकांनी मागणी     हे

रुग्णालयाच्या आवारात असणारी पोलीस चौकी अनेक वर्षापासून बंद अवस्थेत धुळखात

 पंढरपूर गुरुवार दिनांक 9 मार्च पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची रघुनाथ नागरिकांनी मागणी केली आहे .रुग्णालयाच्या आवारात असणारी पोलीस चौकी अनेक वर्षापासून बंद अवस्थेत धूळखातपडली आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी व उपचार घेण्यासाठी आलेल्या समोरासमोरील दोन्ही लोकांमध्ये भर दुपारी दिवसाढवळ्या रुग्णालयाच्या मेन दरवाजाच्या समोर परिसरात कोयत्याने मारहाण केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून या ठिकाणी वर्षातून चार मोठे यात्रा भरतात आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात सध्या पंढरपूर मध्ये दररोज किमान10 ते 15 हजार भावीक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असल्याने पंढरपूर मध्ये गर्दीचे वातावरण नेहमीच दिसत आहे. 

पंढरपूर हे सांगोला मंगळवेढा माळशिरस मोहोळ या चार तालुक्यांना मध्यवर्ती तालुका म्हणून ओळखले जाते. आरोग्य प्रशासनाने वरील सर्व बाबी लक्षात घेता पंढरपूर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय हे 50 खाटाचे सुरू केले होते. त्यानंतर सांगोला मंगळवेढा माळशिरस आणि मोहोळ तालुक्यातील अधिक रुग्णांची संख्या वाढत गेल्याने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासनाने रुग्णांना त्यासाठी हार्दिक खाटाची कांची संख्या वाढवली आणि आरोग्य शासनाने उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर हे सामान्य रुग्णालयामध्ये केले आहे. यापूर्वी फक्त 50 खाटाचे रुग्णालय होते परंतु आत्ता 100 खटांचे सामान्य रुग्णालय करण्यात आले आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्र यात्रा वरचेवर मोठ्या संख्येने भावीक पंढरी दाखल होत असल्याने पंढरीत भाविकांची सोय व्हावी म्हणून रुग्णालयावर महाराष्ट्र आरोग्य प्रशासनाकडून मोठा खर्च केला जातो. सध्या या ठिकाणी महिलांचे डिलिव्हरी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच डोळ्याच्या शस्त्रक्रिया आणि ए आर टी सेंटर इतर उपचार रुग्णावर मोठ्या प्रमाणात केले जातात. चार तालुक्यातून आणि महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून उपजिल्हा रुग्णाच्या मेन गेटच्या शेजारी पोलीस चौकीही उभारली आहे परंतु ही पोलीस चौकी नेहमीच कुलूप लावून बंद अवस्थेत असल्याने फक्त त्या खोलीच्या दरवाज्यावर पोलीस चौकी आणि दरवाजाला लावलेले कुलूप एवढेच दिसत आहे. तर उपजिल्हा रुग्णाच्या मेन दरवाजाच्या पूर्व बाजूला कोपऱ्यामध्ये फक्त दरवाजातून जाणारेच रुग्ण, लोक दिसावेत असा सीसीटीव्ही बसवण्यात आलेला आहे. त्याचा फायदा घेत गेल्या चार दिवसांपूर्वी किरकोळ ग्रामीण भागातील लोकांचे भांडण पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणि मेन दरवाजासमोरच कोयत्याने जबर तिघांवर सपासप वार करत हल्ला केला आहे. ही घटना दुपारी दिवसाढवळ्या उपजिल्हा रुग्णांमध्ये परिसरात घडलेली घटना आहे परंतु सीसीटीव्ही एका कोपऱ्यात आणि फक्त गेटमध्ये जाणारी रुग्ण लोक दिसतात ही एवढी मोठी घटना घडली परंतु त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आले नाही त्यामुळे सीसीटीव्ही बसविण्याचा उपयोग उपजिल्हा रुग्णांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व लोकांना होत नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे. या संबंधित वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांना माहिती विचारली असता आरोग्य शासनाने फक्त नऊ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात परवानगी दिली त्याप्रमाणे रुग्णालयात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच शेजारी असणाऱ्या पोलीस चौकीची माहिती घेतली असता ही चौकी अनेक वर्षापासून बंद आहे या ठिकाणी पोलीस नसतात आम्ही येथील चौकीला पोलीस देण्याची मागणी पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी मागणी केली आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश माने यांनी दिली आहे.