पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कारभार चव्हाट्यावर.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी शेळके किंवा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड याांना माहिती दिली नाही

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कारभार चव्हाट्यावर.

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कारभार चव्हाट्यावर.

देवाच्या पादुकाआणि समई गेली चोरीला.

हे पुरातन मंदिर का स्मशानभूमी.

व्यसनारायण नरसिंह सरस्वती मंदिराच्या पावित्र्याचे काय? 

पंढरपूर शहरातील रामबाग परिसरामध्ये नरसिंह सरस्वती आणि व्यास नारायण पुरातन मंदिर आहे .या मंदिरातील तीन दिवसांपूर्वी नरसिंह सरस्वतीच्या लाकडी पादुका त्या पादुकांना वर चांदीचे कव्हर होते. अशा असणाऱ्या देवाच्या पादुका तसेच पितळी समय चोरीस गेली आहे.या मंदिराची देखभाल आणि पुजा अर्चा मंदिर समितीकडून बक्षी नावाच्या कर्मचाऱ्याकडे येथील जबाबदारी सोपवली असून त्यांनी गेले तीन दिवसापूर्वी देवाच्या पादुका आणि समय चोरी गेली असल्याचे आजपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी शेळके किंवा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड याांना माहिती दिली नाही अथवा सांगितले नाही प्रशासनाधिकाऱ्यांना याबाबतीत अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे . त्यामुळे व्यसनारायण नरसिंह सरस्वती मंदिराच्या पावित्र्याचे काय? अशी देवाच्या मंदिराची जबाबदारी घेणारा कर्मचारी असेल तर त्यांना पुजारी किंवा देखभाल अधिकारी म्हणून जबाबदारी देणे योग्य नाही त्यांना त्वरित निलंबित करावे असे तेथील दर्शनासाठी येणारे भाविक आणि स्थानिक नागरिकातून बोलले जात आहे.हे मंदिर गेले बऱ्याच वर्षांपूर्वी पासूनचे असून मंदिराचे दगडी काम होते . काही दिवसापूर्वी मंदिराचे पुन्हा बांधकाम करायचे म्हणून दगडी काम पाडले आहे. हे सर्व बाजूनी रिकामे ठेवल्यामुळे या ठिकाणी काटेरी झुडपे गवत कमरे एवढे वाढलेले आहे . त्यामुळे येथील मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिकांना सर्प विंचू हे अनेक वेळा आढळून आले आहेत .

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने व शासनाने या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी स्वच्छता करणे गरजेचे आहे तसेच मंदिरात दान पेटी अथवा येथील इतर सर्व वस्तूंचे पालन पोषण करणे आवश्यक आहे. प्रशासन व मंदिर समिती दरवर्षी लाखो रुपये खर्च करून देखभाल करणाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाते. जरासा मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही अथवा चोऱ्या होत असतील तर अशा देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा काय उपयोग आहे. या घडलेल्या घटनेच्या आणि अशा प्रकारामुळे दर्शनासाठी येणारी भाविक व स्थानिक प्रशासन मंदिर समितीच्या विरोधात मुंबई हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती मराठी न्यूज चॅनल साई सम्राटला दिली आहे.

 साई सम्राट सम्राटचे संपादक संपादक यांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांना माहिती विचारली असता त्यांनाही तीन दिवसापूर्वी झालेल्या देवाच्या पादुका व समई चोरी याबद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले . श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी तत्काळ व्यास नारायण मंदिर येथील जबाबदारी दिलेल्या कर्मचाऱ्यांस फोनवरून संपर्क साधला .पंढरपूर शहरात नरसिंह सरस्वती व्यास नारायण मंदिर रामबाग जवळ असून हे स्मशानभूमी पेक्षाही अस्वच्छ काटेरी झुडपे गवत वाढले आहे. स्मशानभूमीही स्वच्छ आणि चांगली असते परंतु या ठिकाणी बघितले तर मंदिराचे पावित्र्य काहीच उरलेले दिसून येत नाही . त्यामुळे मंदिर समिती कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचे या मंदिराकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचेदिसूनयेतआहे.या मंदिराच्या बाबतीत श्री विठ्ठल रुक्मिणीमंदिर समिती कडून चांगले व्यवस्थापन केले जात नाही ही एक दुर्दैवी शोकांतिकाच म्हणावी लागेल.महाराष्ट्र सरकारने पंढरपूर शहरातील अशी पुरातन देवी देवतांची मंदिरे ताब्यात घेऊन त्याची निगा देखभाल आणि दररोज नित्य पूजा व्हावी म्हणून प्रशासनाने आशा देवी देवतांच्या पुरातन मंदिरे ताब्यात घेऊन शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक केली आहे. परंतु सध्या पंढरपूर शहरातील व्यास नारायण नरसिंह सरस्वती मंदिर आपण पाहिले तर स्मशानभूमी पेक्षाही वाईट अवस्था आहे. आत्ता हे मंदिर राहिले नसून स्मशानाचे स्वरूप या मंदिरास प्राप्त झाले आहे.