गुजराती रुखी समाज व अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार

गुजराती रुखी समाज व अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार

गुजराती रुखी समाज व अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार

गुजराती रुखी समाज व अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार

 पंढरपूर नगरपरिषदेमधील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना थकीत उपदानाची व रजा वेतन अनुदानाची तसेच 7 व्या वेतन आयोगाचे 2 हप्त्याची 17 कोटी रक्कम शासनाकडून मिळवून दिल्याबद्दल आमदार प्रशांतराव परिचारक, महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड सुनिल वाळूजकर, अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गुरु दोडिया यांचा सत्कार गुजराती रुखी समाज व अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीने रामा भिका सोलंकी,माधव सोलंकी यांच्या शुभहस्ते माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट माजी नगरसेवक राजू सर्वगोड, इब्राहिम बोहरी, विक्रम शिरसट, माजी नगरसेवक डी. राज. सर्वगोड, संजय निंबाळकर, पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागनाथ तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला 

   यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, पंढरपूर नगरपरिषदेच्या 2017 पासुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना थकीत उपदानाची व रजा वेतन अनुदानाची तसेच कायम कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना 7 व्या वेतन आयोगाचे 2 हप्ते मिळावेत व शासनाने जाहीर केलेली महागाई भत्याची रक्कम मिळावेत म्हणुन वेळो वेळी कामगार संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करण्यात येत होती यावर महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमा मिळाव्यात व सफाई कर्मचारी चे सर्व प्रश्न मार्गी लावावे म्हणून मी विधान परिषदे मध्ये आवाज उठवला होता शासनाने याची दखल घेत आपल्या सर्व मागण्या पैकी काही मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे उर्वरित मागण्याबाबत सुद्धा मी आपल्या पाठीशी पासून सर्व मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहीन व वेळ पडल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही बैठकीचा आयोजन केले जाईल असे आश्वासन यावेळी दिले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना

महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड सुनील वाळुजकर यांनी सांगितले की

संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका कामगार संघटनेच्यावतीने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची संघटनेच्यावतीने बैठक लावण्यात आली या बैठकीमध्ये मा.ना.अजितदादा पवार व मा एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील 257 नगरपालिकांचे शासनाकडे राहिलेल्या थकीत सहा वेतन अनुदानची 900 कोटी रक्कम आदा करण्यात आली. त्यामध्ये पंढरपूर नगरपरिषदेला कर्मचा-यांची थकीत सेवानिवृत्ती वेतन, रजा वेतन, 7 व्या वेतन आयोगाची पोटी 2 हप्त्याची रक्कम व इतर देणी देण्यासाठी 17 कोटी रूपये नगरपरिषदेला मिळाले कारण शासनाने सन 2017 पासुन महाराष्ट्रातील नगरपरिषदांना वेतनापोटी देत असलेले सहा वेतन अनुदान हे पुर्णपणे न देता देय असलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम कपात करून वेतन अनुदान दिले जात होते त्यामुळे नगरपरिषदेला स्वतच्या फंडातुन रक्कम टाकुण कर्मचा-यांचे वेतन आदा करावे लागत होते. त्यात कोरोना काळामध्ये कराची वसुली न झाल्याने नगरपरिषदां आर्थिक अडचणीमध्ये सापडल्या होत्या सदरची थकीत रक्कम मिळावी म्हणुन गेल्या पाच वर्षापासून राज्यातील सर्व संघटनेच्या माध्यमातुन वेळोवेळी आंदोलने करण्यात येत होती तसेच ही बाब आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर आमदार प्रशांतराव परिचारक यांनी महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना व पंढरपूर नगरपालिकेला देय असलेली थकित 900 कोटी रक्कम मिळावी व महाराष्ट्रातील अन्य नगरपरिषदांना सुद्धा थकित रक्कम अदा कराव्यात म्हणुन विधानपरिषदेमध्ये ताराकिंत प्रश्न उपस्थित करून या बाबत आवाज उठविला होता शासनाने याची दखल घेत महाराष्ट्रातील व पंढरपूर नगरपालिकांना थकीत रक्कम देण्याबाबत निर्णय घेतला व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रक्कमा मिळण्यास मदत झाली त्याबद्दल पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार प्रशांतराव परिचारक यांचे आभार व्यक्त केले तसेच 

अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष गुरु दोडिया यांनी नगरपालिका सफाई कामगारांच्या विविध मागण्या मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लावावा, सफाई कर्मचाऱ्यांना पिवळे कार्ड मिळवून द्यावे व इतर विविध मागण्याबाबत आपण लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्याकडे केली

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गुरु दोडिया, अनिल गोयल, महेश गोयल, सतीश सोळंकी,समाजाचे उपाध्यक्ष काशीनाथ सोलंकी,रवि वाघेला,आदित मेहडा,मदन परमार,गमजी वाघेला,जितेश वाघेला,रवि दोडिया,मुकेश गोयल,रजनिश गोयल,भावेश मेहडा,विजय वाघेला,नितिन मेहडाव त्याचे सर्व सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी मेडसिंगकर सर स्वागत व आभार महेश गोयल यांनी मानले

या कार्यक्रमास सामजिक कार्यकर्ते शैलेश बडवे अमोल डोके, बशीर तांबोळी, नरेंद्र डांगे, विशाल आर्वे , चेअरमन संतोष सर्वगोड, दत्तात्रय चंदनशिवे, रामेश्वर सातपुते, उमेश अधटराव हे उपस्थित होते