सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येणार?

सोलापूर जिल्हा परिषदेचा कारभार शासनाच्या नियमानुसार सर्वसामान्य जनतेला सुविधा आणि योजना योग्य प्रकारे राबवल्या जातात

*सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येणार** *राज पंचायत अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी योग्य निर्णय घेण्याचे दिले आश्वासन*.

पंढरपूर दि.१५ जून. सोलापूर जिल्हा परिषदेचा कारभार शासनाच्या नियमानुसार सर्वसामान्य जनतेला सुविधा आणि योजना योग्य प्रकारे राबवल्या जातात का यासाठी महाराष्ट्र शासनाची पंचायत राज समिती सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असून यामध्ये येते सोलापूर जिल्हा परिषदेचा संपूर्ण कारभार आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार यावर असुड ओढणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीची अनेक प्रकरणे यामध्ये अनियमितता झाली असून बेकायदेशीर मार्गाने पदोन्नती देण्यात आल्या आहेत. नियम डावलून अनेक कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्त्या देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तर कहरच केला असून यातील अनेक योजना जनते पर्यंत पोहोचल्या नसतानाही त्याची टेंडर योजना यशस्वीपणे राबविल्या गेले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये अनियमितेचा कळस असलेले चा विभाग म्हणजे आरोग्य विभाग असून आरोग्य विभागाच्या तक्रारीत सर्वात महत्वाची तक्रार म्हणजे कोरोना काळात शाळा बंद असताना आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांची केलेली तपासणी ही संशयास्पद बाब आहे. त्याचबरोबर कोरोना काळातील औषध खरेदी योजना नाविन्यपूर्ण औषध खरेदी योजना जनतेपर्यंत किती पोचली हे आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनाच माहिती . ग्रामीण भागातील आरोग्य उप केंद्रासाठी शासनाने उपाहारगृहे योजना अमलात आणली होती त्यासाठी निधी पण पारित केला परंतु जिल्हा आरोग्य धिकार्‍यांच्या मनमानी आणि हेकेखोरपणा मुळे सदर निधी परत गेला याची सखोल चौकशी होणे गरजेचे राज पंचायत समितीचे अध्यक्ष माननीय संजयजी रायमुलकर साहेब आणि सर्व समिती तसेच समितीतील सदस्य आणि जबाबदार अधिकारी सदर अनियमितता आणि भ्रष्टाचार उघड करण्यासाठी योग्य ते प्रयत्न सोलापूर जिल्ह्याचे हितासाठी करतील ही अपेक्षा बाळगून पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष माननीय संजयजी रायमुलकर यांचेकडे विस्ताराने आणि पुराव्यासह सादर केल्या. अध्यक्ष यांनी सदर तक्रारीवर गंभीरपणे आणि पारदर्शक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.