सीआयडी असल्याचे सांगून भामट्याने सोन्या साखळी सोन्याच्या अंगठ्या 1 लाख 75हजाराचा ऐवज केला लंपास.

उपरी येथील श्री अंकुश रामचंद्र मोहिते हे आज सकाळी 11वाजण्याची सुमारास अंकुश मोहिते व त्यांचा मेहुना किसन लक्ष्मण नागणे

सीआयडी असल्याचे सांगून भामट्याने सोन्या साखळी सोन्याच्या अंगठ्या 1 लाख 75हजाराचा ऐवज केला लंपास.

सीआयडी असल्याचे सांगून भामट्याने सोन्या साखळी सोन्याच्या अंगठ्या 1 लाख 75हजाराचा ऐवज केला लंपास

पंढरपूर दिनांक 20 जुलै पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील श्री अंकुश रामचंद्र मोहिते हे आज सकाळी 11वाजण्याची सुमारास अंकुश मोहिते व त्यांचा मेहुना किसन लक्ष्मण नागणे हे दोघेजण त्यांच्या पुतण्याच्या मेव्हण्याच्या लग्नासाठी दोघेजण मोटरसायकल वरून शेगाव दुमाला येथे आले असता लग्न झाल्यानंतर पुन्हा उपरी येथील घराकडे दुपारी 1/30 वाजता जात असताना वाखरी चौकाच्या अलीकडे चिंचेच्या झाडाजवळ एक काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल वर एक अनोळखी आमच्या गाडीच्या पाठीमागून पुढे जाऊन त्याने त्याची मोटरसायकल थांबवली आणि आमची गाडी थांबवण्यास सांगितले.

 आम्ही गाडी थांबल्यानंतर त्याने रस्त्याने चालत जाणारया एका इसमास थांबवून त्याचे खिसे तपासले व त्याचे गळ्यातील चैन काढून त्याचे रूमलात बांधून त्याच्याकडे दिली. त्यानंतर मी व माझे मेहुणे तिथेच गाडीवर थांबलो असताना त्याने मला मी सीआयडी चा साहेब आहे मी गांजा पुड्या विकणारा माणूस तपासत आहे असे म्हणून त्याने खिसे तपासले आणि म्हणाला मला वाटले तुम्ही गांजा पुड्या विकणारे आहात असे मला वाटले .

असे म्हणून मला गांजा पुड्या विकणारा माणूस सापडेपर्यंत तुम्ही असे सोने घालून फिरू नका असे म्हणाल्याने मीमाझे गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची एक तोळ्याची अंगठी आणि दुसरी एक तोळ्याची लाल खड्याची अंगठी अशी सोन्याची दागिने व खिशातील लायसन कागदपत्रे काढल्यावर त्या अनोळखी इसम भामट्याने माझ्या जवळील रुमालात बांधून माझ्याजवळ दिले. आणि तुमचा मोबाईल पैसे खिशात ठेवा आणि तुम्ही जावा म्हणाल्यावर मी त्याने बांधून दिलेला माझा रुमाल बघितला असता त्या रूमलात फक्त लायसन व इतर कागदपत्र दिसले .

त्यामध्ये माझी सोन्याची चैन दोन सोन्याच्या अंगठ्या दिसल्या नाहीत .

यावरून सदर अनोळखी इसमाने माझी फसवणूक केल्याचे माझ्या लक्षात आले फसवणूक करणारा इसम हा 40 ते 45 वयाचा असून अंगावर काळ्या रंगाचा शर्ट व पॅन्ट डोक्यावर गोल टोपी रंगाने गोरा आशा वर्णाचा होता सदर घडलेला प्रकार मी माझा पुतण्या शहाजी सुरेश मोहिते व मामाचा मुलगा शहाजी शिवाजी नागणे यांना सांगितला व त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली आहे. फसवणूक झालेल्या सोन्याचे वर्णन 80 हजाराची दोन तोळ्याची डिझाईन सोन्याची चैन50हजाराची एक तोळ्याची पीळ्याची अंगठी 45 हजाराची एक लाल खड्याची अंगठी असे एकूण 1 लाख 75 हजाराचा ऐवज भामट्याने लंपास केला असून पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस हे करीत आहेत.