साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी चेअरमनचीच

साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी चेअरमनचीच

साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी चेअरमनचीच

साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी चेअरमनचीच पंढरपूर दि..6 डिसेंबर परवा झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे इतर साखर कारखानदार ही कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या विषयी खडबडून जागे झाले असल्याचे दिसून येत आहे. गळीत हंगाम संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गोळीत हंगामाला कारखाना सुरू करताना फॅक्टरी इन्स्पेक्टर ने सर्व यंत्रणेची पाहणी करून कारखाना चालवण्यास योग्य असल्याचा रिपोर्ट सादर करावा लागतो त्यानंतरच साखर कारखाने सुरू केले जातात. त्याचबरोबर मानवी जीवनाला म्हणजेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांना कोणताही कारखान्यांमध्ये धोका होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा विषयी कारखाना चालकाची मोठी जबाबदारी असते. त्याचबरोबर कर्मचारी खाली आणि वरती काम करत असताना त्याच्या डोक्याला हेल्मेट असणे गरजेचे आहे तसेच वरून अंगार किंवा डोक्यावर काही वस्तू पडू नये यासाठी सुरक्षा म्हणून जाळी बांधणे गरजेचे असते. तसेच ज्या विभागातील यंत्रणेवर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते त्या विभागाचा त्या कर्मचाऱ्यास प्रशिक्षण अथवा अनुभव असणे गरजेचे असते. एखादी चुकून दुर्दैवी मोठी घटना घडली तर या सर्व साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा विमा व भविष्य निर्वाह निधी नियमानुसार प्रत्येक साखर कारखानदरानी देणे बंधनकारक आहे. सहकार खात्याच्या अतिरिक्त खाली चालणारे या कारखान्यांची साखर संघाचे सहाय्यक आयुक्त यांनी लक्ष लागले गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सर्व कारखान्यातील कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन संघटनेच्या माध्यमातून चौकशी लावणार असल्याचे एका संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले आहे. परवा झालेल्या विठ्ठल कारखान्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे दोघांना जीव गमावू लागला आहे त्यामुळे यापुढे आशा कर्मचारी च्या नशिबी अशी वेळ येऊ नये यासाठी योग्य तो निर्णय संघटनेच्या माध्यमातून घेणार आहोत अशी माहिती मिळाली आहे.

विठ्ठल साखर कारखान्यातील दोन कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील महाराष्ट्रभर चर्चेत असणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणू नगर गुरसाळे कोरोना कार्यकाळात दोन वर्ष कारखाना बंद होता पुढे काही दिवसानंतर या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली निवडणूक दरम्यान सध्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भगीरथ भालके युवराज पाटील यांचा दारुण पराभव केला. काही महिन्यापूर्वी नुकतीच निवडणूक पार पडली आणि ऊस उत्पादक सभासदांनी भरघोस मताधिक्यांनी अभिजीत पाटील गटाला कारखान्याचे वरर्चस्व मिळवून दिले. नंतर विठ्ठल कारखान्याच्या नूतन संचालकांनी बिनविरोध अभिजीत पाटील यांना साखर कारखान्याचे चेअरमन तर स्वेरी कॉलेजचे संस्थापक रोंगे सर यांच्या पत्नीसो प्रमिला रोंगे यांना व्हाईस चेअरमन पदी निवड केली.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना नवीन चेअरमन व संचालक यांनी सुरू करून ८० दिवस लोटले आहेत. एवढ्यात श्री विठ्ठल कारखान्याने चालू हंगामात २ लाख मॅ. टन गाळप केले आहे. ही ऊस उत्पादक व संचालकांच्या बाबतीत आनंदाची बाब म्हणावी लागेल. परंतु रविवार दिनांक 4 डिसेंबर २०२२ रोजी अचानक सकाळी९/३० वाजण्याच्या सुमारासश्री विठ्ठल साखर कारखान्यातील बॉयलिंग स्टीम वॉल तुटून त्याचा जोराने दणका दोन कर्मचाऱ्यांना बसल्याने त्यांना कायमचा जीव गमावा लागला आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. त्यांच्या गावात आणि तालुक्यामध्ये त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

परंतु रविवार दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी सकाळी श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील भंडी शेगाव येथील धनाजी सुरवसे यांच्या नवीन विठाई इंटरप्राईजेस ब्लोअर उद्योग समूहाचे फीत कापून उद्घाटन करण्यासाठी चेअरमन अभिजीत पाटील गेले होते. याप्रसंगी कै. वसंतराव साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे एडवोकेट दीपक पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योजक नागेश फाटे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उद्योजक महेश साठे यांचे सह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या सत्कार समारंभ करण्यासाठी श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे या प्रसंगी जोमात होते. ती वेळ रविवार दिनांक 4 डिसेंबर 2022 सकाळी ९ची आणि विठ्ठल साखर कारखान्यात त्याच दिवशी त्याच वेळी अचानक मोठी अपघाती घटना घडली म्हणजे एकीकडे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन एका जवळच्या व्यक्तीच्या नवीन उद्योग सुरू करणाऱ्या कार्यक्रमात तर दुसरीकडे म्हणजे श्री विठ्ठल साखर कारखान्यात अचानक दुर्दैवी घटना घडली . विठ्ठल साखर कारखान्यातील तरुण कर्मचारी सुधाकर चौगुले आणि सोमनाथ नरसाळे यांना कायमचे कोमात जाऊन मृत्यूला सामोरे जावे लागले . एक प्रकारे त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांना कायमचे जीवितस मुकावे लागले या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबालाही काळा दिवस उजाडला त्यामुळे कुटुंबावरही संकट ओढवले आहे.