पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे क्षमता व बांधणी प्रशिक्षण शिबिर संपन्न

जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा मोफत मिळावी व त्यांना गोल्डन कार्ड

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे क्षमता व बांधणी प्रशिक्षण शिबिर संपन्न

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे क्षमता व बांधणी प्रशिक्षण शिबिर संपन्न

सफाई कामगारांना १० लाखाचा पोस्टल अपघात विमा

योजनेचा लाभ देणार-- डॉ.प्रशांत जाधव 

पंढरपूर दिनांक 13 जानेवारी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी यांची बैठक घेऊन या बैठकीमध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या व सफाई कर्मचाऱ्यांना विमा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ किंवा आरोग्य शिबिर यासारख्या योजना राबवल्या म्हणून सूचना दिल्या होत्या त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे क्षमता व बांधणी प्रशिक्षण शिबिर कॅम्प फाउंडेशन पुणे यांचे मार्फत नगरपालिका सभागृह आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांचे हस्ते उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळूजकर,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर कॅम्प फाउंडेशन पुणे संचालिका डॉ .नीतू सिंग यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी सांगितले की , जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर परिषदेचे प्रशासक गजानन गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे क्षमता व बांधणी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे. पंढरपूर शहरामध्ये वर्षातून चार मोठया यात्रा व इतर वेळी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात येणाऱ्या भाविकांना सेवा सुविधा देत असताना आरोग्याचे यंत्रणेवर ताण येत असतो शहर स्वच्छतेचे काम नगर परिषदेचे सर्व सफाई कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे करत असतात परंतु स्वच्छतेचे काम करत असताना काळजी घेणे ही आवश्यक आहे कर्मचाऱ्यांमध्ये जागृती यावी म्हणून या शिबिरा मध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे दररोजचे काम व त्या मध्ये घ्यावयाची काळजी, सफाई कामातील जोखीम व त्याबाबत घ्यावयाची दक्षता, सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य विषयक समस्या व त्यावरील उपाय योजना यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान दर्जा उंचावण्याचे दृष्टीने नगरपरिषदेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा रक्कम रुपये 396 पोस्टल विभागाकडे भरून दहा लाखाचा विमा उतरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली तसेच प्रत्येक सफाई कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबीयांची आयुष्यमान भारत योजना अंतर्गत नोंदणी करून त्यांना जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा मोफत मिळावी व त्यांना गोल्डन कार्ड देण्यासाठी स्वतंत्र कक्ष नगर परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात आली व त्याचा वापर करणे विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळूजकर,आरोग्य अधिकारी श्री शरद वाघमारे श्री नागनाथ तोडकर व सर्व सफाई कर्मचारी सर्व मुकादम उपस्थित होते.