विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेस प्रारंभ

शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त

विठ्ठल नामाच्या जयघोषात  पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेस प्रारंभ

विठ्ठल नामाच्या जयघोषात

पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेस प्रारंभ

पंढरपूर, ता. २३ : भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशा सुमारे २,१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेस गुरुवारी विठ्ठल नामाच्या जयघोषात प्रारंभ झाला . 

भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान ( पंजाब ) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली असून शांती, समता, बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत . या यात्रेने २३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून प्रस्थान ठेवले . प्रस्थान पूजा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सीमाताई नेवासकर यांच्या हस्ते करण्यात आली . याप्रसंगी सरचिटणीस डॉ अजय फुटाणे, विभागीय उपाध्यक्ष रवीअण्णा राहणे , अजिंक्य शिंदे , नाशिक जिल्हाध्यक्ष अतुल मानकर, पंकज सुत्रावे , भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष शंकर टेमघरे , सचिव ॲड विलास काटे , खजिनदार मनोज मांढरे , विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे , राजेन्द्र मारणे यांच्या सह सायकल यात्री उपस्थित होते . 

आज हा सोहळा अरण , कुर्डुवाडी , म्हैसगाव मार्गे बार्शी मुक्कामी पोहोचला . संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे पोचणार आहे.