श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा.

विठ्ठलाकडे 11 ब्रम्हवृदांकडून रूद्राचा अभिषेक व श्री.रूक्मिणीमातेस 11 ब्रम्हवृंदाकडून पवमान अभिषेक

  श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा.

  श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा.

 प्रतीवर्षी प्रमाणे कार्तिकी यात्रा शुक्रवार दिनांक 04 नोव्हेंबर, 2022 रोजी संपन्न झाली. या यात्रेला भाविकांची गर्दी विचारात घेऊन, परंपरेनुसार चांगला महुर्त व दिवस पाहून दि.28/10/2022 रोजी श्रींचा पलंग काढून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद करून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधादक्षा हे राजोपचार सुरू करण्यात आले होते. 

 सदरचे राजोपचार पूर्ववत करण्यासाठी चांगला महुर्त व दिवस पाहून कार्तिक वद्य 5 रविवार, दि.13/11/2022 रोजी श्रींची विधिवत प्रक्षाळपुजा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्री.विठ्ठलाकडे 11 ब्रम्हवृदांकडून रूद्राचा अभिषेक व श्री.रूक्मिणीमातेस 11 ब्रम्हवृंदाकडून पवमान अभिषेक करण्यात आला.

 श्री.विठ्ठलाची व श्री.रूक्मिणीमातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मा. सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, मा.सदस्य श्री.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. त्यावेळी कार्यकारी अधिकारी श्री संजीव जाधव व व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान/पाणी घालण्यात आले. रात्री शेजारती नंतर देवाचा शिणवटा घालविण्यासाठी 17 वनस्पतीचा काढा दाखविण्यात येणार आहे.