पंढरपूर वंचित बहुजन आघाडीचा येत्या 20जूनला तहसील कार्यालयावर मोर्चा.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या

पंढरपूर वंचित बहुजन आघाडीचा येत्या 20जूनला तहसील कार्यालयावर मोर्चा.

पंढरपूर वंचित बहुजन आघाडीचा येत्या 20जूनला तहसील कार्यालयावर मोर्चा.

शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणावर निषेध मोर्चा.

महाराष्ट्रातील दलितावर सतत आणि सुरू आहे त्याला जबाबदार शिंदे फडणवीस सरकारचा आहे. नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून तेथील जातीवादी व मनवाद्यांनी अक्षय भालेराव यांची निर्गुण हत्या केली तसेच जातिवाचक शिवीगाळ करत दहशत पसरविण्याचे कृत्य केले आहे. बोंड आळी येथील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. तसेच मुंबई येथे सावित्रीबाई फुले वस्तीगृह येथे शिक्षणासाठी राहत असलेल्या मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्या केली त्यांच्यावर कायदेशीर त्याकडे कारवाई करावी. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे मातंग बांधवांची सावकारकीच्या वादातून हत्या करण्यात आलेली आहे सदर हत्ती जबाबदार असलेल्या संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात दलित व मुस्लिम वर होत असलेल्या अत्याचार आणि थांबवण्यासाठी खडक कायदा करावा आणि ठिकाणी दलित मुस्लिम मोब्लीचिंगचे शिकार झाले असून बऱ्याच मुलींवर बलात्कार करण्यात आलेले आहेत तरी संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्याचप्रमाणे आळंदी येथे इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून वारकरी भाविकांवर सौम्य लाठी हल्ला करण्यात आला याप्रकरणी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ बघून संबंधित दोषीवर कडक कारवाई करावी या सर्व बाबतीत पंढरपूर शहर व तालुक्यातील बहुजन वंचित आघाडीचे वतीने येत्या 20 जूनला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर व तालुक्यातील पदाधिकारी सतीश कांबळे सचिन लोंढे लिंगेश्वर सरवदे, सोमनाथ गायकवाड माया खरे, बिराप्पा मोटे, हनुमंत आढाव, बाळाबाई ढावरे, कविता दंदाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.