सौ.शामल लक्ष्मण शिरसाट(पापरकर ) यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पंढरपूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार शामल शिरसाट यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

सौ.शामल लक्ष्मण शिरसाट(पापरकर ) यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सौ.शामल लक्ष्मण शिरसाट(पापरकर ) यांच्या प्रचाराचा शुभारंभ

शहराच्या सुशोभिकरणासाठी माझी उमेदवारी : शामल पापरकर

पंढरपूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार शामल शिरसाट यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे भाजप नगराध्यक्ष पदासाठी कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने शामल शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे शानल शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या ४० वर्षापासून शिरसट कुटुंब राजकारणात सहभागी आहे. शामल शिरसट यांचे पती लक्ष्मण शिरसट व मुलगा विक्रम शिरसट यांनी नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेआहे. शिरसट यांचे पंढरपूर शहरातील मतदारांची चांगले संबंध आहेत.गेल्या ४० वर्षापासून त्यांनी त्यांच्या

प्रभागामध्ये विविध विकासकामे केली आहेत. गोरगरिबांना मदत केली आहे. यामुळे या निवडणुकीत शिरसट यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. शिरसाट यांच्या पाठीमागे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठी ताकद उभी केली आहे. तर किंगमेकरची भूमिका उमेश परिचारक बजावीत आहेत. पंढरपूर शहरांमध्ये ओबीसी मते जास्त असल्यामुळे भाजपने राजकीय खेळी करून ओबीसी असलेल्या शामल शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसाट यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असल्याचे दिसून येत आहे.