विठ्ठल कारखान्याचा 41वा  गळीत हंगाम शुभारंभ

विठ्ठल कारखान्याचा 41 वा गळीत हंगाम भाजपा नेते प्रवीण दरेकर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या शुभहस्ते

विठ्ठल कारखान्याचा 41वा  गळीत हंगाम शुभारंभ

विठ्ठल कारखान्याचा 41वा  गळीत हंगाम शुभारंभ

विठ्ठल कारखाना हाच माझा राजकीय पक्ष .चेअरमन अभिजीत पाटील

भाजपा नेते प्रवीण दरेकर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या शुभहस्ते

विठ्ठल कारखान्याचे सभासद आणि विठ्ठल कारखाना, हाच माझा राजकीय पक्ष आहे. यांच्या उन्नतीसाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. यापुढील काळात विठ्ठल परिवाराकडेच सर्व सत्ता केंद्रेराहतील , याचा मला ठाम विश्वास आहे, असे मत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. विठ्ठल कारखान्याच्या ४१ व्या गळित शुभारंभ भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि साखर आयुक्त शेखर गायकवाड, यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

दोन वर्षानंतर प्रथमच विठ्ठल सहकारी साखर कारखाना गळीत हंगामास सामोरे जात आहे. विठ्ठल कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन अभिजीत पाटील यांनी कारखान्यास उर्जितावस्था आणली आहे. येत्या गळित हंगामात सुमारे १५ लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या हंगामात उसाची रिकवरी ११ राहील , याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल. याचवेळी ऊसाला प्रति टन २५०० रुपयांचा भाव देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर, आ. शहाजी बापू पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, अविनाश महागावकर, डॉ. बीपी रोंगे , आदिंसह विविध मान्यवर उपस्थित होते.

भाजपा नेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर यांनी विठ्ठलच्या अवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. यापूर्वी पंढरपूरला विठ्ठलच्याच निवडणुकीसाठी, मनसेकडून आलो होतो. यावेळी दहा ते वीस सभाही घेतल्या होत्या. यानंतर अभिजीत पाटील यांची ओळख झाली. अभिजीत पाटील यांना कर्ज देण्यात कोणतीही कुचराई केली नाही. विठ्ठल साखर कारखान्यासाठी आपण अभिजीत पाटील यांच्या पाठीशी कायमच उभे राहिलो, आणि पुढेही राहणारच असे सांगून शेतकऱ्यांचे प्रपंच उभे करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, आणि याच प्रयत्नाचे समाधान आज आपणास होतं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर व्यवसायातील अनेक किस्से सांगितले. जगात भारताकडून सर्वाधिक मे. टन साखरेची निर्यात होत आहे. भारतात दरवर्षी ११२ लाख मे. टन साखर तयार होत असून यापैकी ७० लाख मे. टन साखर एकट्या महाराष्ट्रात तयार होत आहे. जगातील बहुतांश देश पंढरपूरमध्ये तयार झालेली साखर खाण्यास प्राधान्य देत आहेत. शेतकरी सभासदांनी चांगल्या साखर कारखान्याला आपला ऊस द्यावा, असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. यावेळी विठ्ठल कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक, आणि सर्व संचालक मंडळ, यांचेसह शेतकरी सभासद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.