लम्पी आजार काळजीच्या जागृतीसाठी पशुपालक मेळावा. प्रणव परिचारक 

लम्पी आजाराच्या जागृतीबाबत पशुपालक मेळाव्याचे आयोजन

लम्पी आजार काळजीच्या जागृतीसाठी पशुपालक मेळावा.  प्रणव परिचारक 

लम्पी आजार काळजीच्या जागृतीसाठी पशुपालक मेळावा.

प्रणव परिचारक

पंढरपूर.दी.23 आजादी का अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय नेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरावड्यानिमित्त आ. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका दूध उत्पादक संघ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने लम्पी आजाराच्या जागृतीबाबत पशुपालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवानेते प्रणव परिचारक यांनी दिली.

  गेल्या काही दिवसापासून देशात राज्यात लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगामुळे हजारो जनावरे बाधित होत आहेतम मृत्युमुखी पडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातही लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यासाठी मार्गदर्शक शिबिर पंढरपूर तालुक्यातील करकंब या ठिकाणच्या आनंदी मंगल कार्यालय आणि पंढरपूर येथील अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यासाठी पशुवैद्यक महाविद्यालय परभणी येथील डॉ. नितीन मार्कंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी 25 सप्टेंबर रोजी करकंब येथे सकाळी दहा वाजता आणि पंढरपूर येथे दुपारी चार वाजता होणार आहे. 

तरी पशूपालक मेळाव्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पशुधनाच्या काळजीसाठी पुढाकार घ्यायचा आहे. याबाबत पंढरपूर तालुका दूध उत्पादक संघ पशुसंवर्धन विभाग आणि पांडुरंग परिवार यांच्या वतीने आ. प्रशांत परिचारक यांच्या सुचनेवरुन प्रणव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली असून या बैठकीस सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ विश्वास मोरे,पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ भिंगारे व इतर पशु अधिकारी उपस्थित होते. या पशुपालक मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रणव परिचारक यांनी केले आहे.