आर्यवैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारी मंडळाचे तिसरे अधिवेशन 

श्रीयश पँलेस येथे कार्यक्रमाचे आयोजन

आर्यवैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारी मंडळाचे तिसरे अधिवेशन 

आर्यवैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारी मंडळाचे तिसरे अधिवेशन 

येत्या ३ व ४ फेब्रुवारी रोजी पंढरपुर  होणार.

श्रीयश पँलेस येथे कार्यक्रमाचे आयोजन 

पंढरपूरप्रतिनिधी – महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारी मंडळाचे तिसरे अधिवेशन येत्या शनिवारी ,ता.३  आणि रविवारी ,ता.४  येथील श्रीयश पँलेस येथे आयोजिण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब कौलवार यांनी दिली.या संदर्भात माहिती देताना कौलवार यांनी सांगितले की, या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत. हिंगणघाट येथील आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते या अधिवेशानाचे उदघाटन केले जाणार आहे.या वेळी तेलंगणा येथील निजामाबाद मतदार संघाचे आमदार धनपाल सुर्यनारायना, आंध्रप्रदेशचे पर्यावरण व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गुब्बा चन्द्र शेखर आणि काशी अन्नछत्राचे तदर्थ समिती सदस्य बच्चू गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिवाय आचार्य महेश महाराज जिंतूरकर, सपना मुनगंटीवार, माधुरी कोले, विवेक भीमनवार, डाँ.प्रवीण आष्टीकर,एकनाथराव मामडे, दिलीप कंदकुर्ते आदींची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.  येथील कराड रोडवरील पंतनगर शेजारी असलेल्या श्रीयश पँलेस येथे येत्या शनिवारी (ता.३) आणि रविवारी (ता.४) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे अधिवेशन संपन्न होणार आहे. या अधिवेशनास राज्य तसेच परराज्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे देखील आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंद बिडवई आणि महासभेचे कोषाध्यक्ष सुभाष कन्नावर, सचिन लादे, शिरीष पारसवार सुरेंद्र कवठेकर ,कौस्तुभ गुंडेवार, राजेंद्र वट्टमवार ,संगम कणकणवार पांडुरंग कटकमवार ,विठ्ठल कटकमवार, राजू कौलवार, रवी लव्हेकर आदींसह महासभेचे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.

आक्षणाच्या मागणीवर देखील होणार चर्चा 

समाजाचा सर्वांगीण विकास हेच राष्ट्र उन्नतीचे माध्यम आहे. या उद्देशाने समाज संघटन आणि बळकटीकरणासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बरोबरच या अधिवेशना मध्ये समाजाच्या आरक्षण मागणीच्या विषयावर देखील चर्चा केली जाणार आहे.