पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवणार

जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती मागणी

पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवणार

पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवणार - मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव

पंढरपूर दिनांक 3 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांचा वसाहतीमध्ये ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती याची दखल घेत जिल्ह्याचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी ची विशेष बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना भेटी देऊन कर्मचाऱ्यांच्या असलेल्या घरांची किरकोळ दुरुस्ती, सेवानिवृत्त कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी बसवण्याबाबत सूचना दिल्या होत्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे व समन्वय समितीचे राज्याचे सेक्रेटरी अँड .सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरु दोडिया यांच्या समवेत नगर परिषदेच्या गुजराती कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर व नगरपरिषद कर्मचारी ची घनश्याम हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी समक्ष भेटी दिल्या यावेळी ज्या ठिकाणी ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवायचे आहेत त्या ठिकाणांची पाहणी केली तसेच गुजराती समाजाच्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमधील घरांची ही पाहणी करून ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या घरावरील पत्रे खराब झाले आहेत अथवा किरकोळ दुरुस्ती करायची आहे त्याची पाहणी करून त्या ठिकाणी दुरुस्ती करावी म्हणून अभियंता प्रवीण बैले यांना सूचना दिल्या. सदरची कामे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी झाली पाहिजे असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले तसेच गुजराती कॉलनी येथे असलेल्या समाज मंदिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी सुरू करण्याबाबत चर्चा झाली तसेच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या प्रतीचे शौचालय ही बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनिल वाळूजकर व अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरु दोडीया यांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व कार्यक्षम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळेच या कामाला गती आली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब व मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांचे विशेष आभार व्यक्त केले.यावेळी नानासाहेब वाघमारे,महेश गोयल,सतीश सोलंकी,अनिल गोयल,दत्तात्रय चंदनशिवे, संतोष सर्वगोड, धनंजय वाघमारे, जयंत पवार,दिनेश साठे,संजय वायदंडे,महावीर भाऊ कांबळे,संदेश कांबळे,दशरथ यादव हे उपस्थित होते