मुंबई येथे दिव्यांग अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारणार

प्रहार संघटनेचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नाला यश.

मुंबई येथे दिव्यांग अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारणार

मुंबई येथे दिव्यांग अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारणार

 प्रहार संघटनेचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नाला यश. दिव्यांग व अपंगा मध्ये आनंदाचे वातावरण

पंढरपूर दिनांक 9 नोव्हेंबर प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे सचिव संजय जगताप यांनी माहिती दिली आहे. मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी राज्यमंत्री प्रहार संघटनेचे प्रमुख यांच्यामध्ये मुंबई मंत्रालय येथे दिव्यांग अपंग यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय उभा राहावे याकरिता अनेक वर्षापासून माजी राज्यमंत्री बच्चू कडू व देशातील महाराष्ट्रातील दिव्यांग व अपंगांची अपेक्षा होती त्यानुसार 9 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिव्यांग अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभा राहणार असल्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती प्रहार संघटनेचे प्रमुख श्री बच्चू कडू यांनी सांगितले. त्याचबरोबर येत्या 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग व अपंग भवन उभारणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग व आपण महिला पुरुषांच्या आशा पलवीत झाल्या आहेत. दिव्यांग व अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभा राहिल्यानंतर देशातील व महाराष्ट्रातील दिव्यांग अपंगांच्या अडीअडचणी सुटतील व त्यांना या पुढील दिवस चांगले येतील असे काही प्रहार संघटनेची निगडित असणाऱ्या दिव्या व अपंग महिला व पुरुषांनी सांगितले