चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांचे एकदिवसीय धरणे आंदोलन*
कोतवालाना अद्याप पर्यंत चतुर्थ श्रेणी चा दर्जा मिळाला नाही
चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांचे एकदिवसीय धरणे आंदोलन*
मागण्या मान्य न. झाल्यास 26 तारखेपासून मुंबईत आझाद मैदानावर करणार आंदोलन*
सोलापूर दि. 24 राज्यातील कोतवालांनी चतुर्थ चा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार दिनांक 24 राज्यभरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन केले असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना लेखी निवेदन दिले आहेत*. जर दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 25 तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. *अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिली.गुरुवारपासून दि 26 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचे घटक आहे. महसूल गोळा करणे निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवरील नित्य नियमाची कामे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत असून कोतवालाना अद्याप पर्यंत चतुर्थ श्रेणी चा दर्जा मिळाला नाही त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील हजारो कोतवाले आंदोलनात सहभागी होणार असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे.कोतवाल महसूल विभागातील शेवटचा भाग आहे. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करणे, महसूल गोळा करणे, गौणखनीज आळा बसविणे, निवडणूक कामकाज, नैसर्गिक आपत्ती, पीक पाणी, दुष्काळात नुकसान भरपाई, पंचनामाचे सर्वेक्षण, करणे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस पाटील व पोलीस प्रशासनास मदत करणे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना सहाय्य करणे अशा अनेक कामकाजात कोतवाल हा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. मात्र, हा कोतवाल साठ वर्षापासून चतुर्थ श्रेणीसाठी सतत झगडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निघाली काढावा अन्यथा होणाऱ्या नुकसान राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन गेल्या पन्नास वर्षांपासून च्या मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी सध्या जोरदार आहे.
कोतवाल कर्मचारी संघटना मागण्या* :
➡️ कोतवाल एकजुटीचा विजय असो.
➡️ कोतवालाना चतुर्थ श्रेणी मिळालीच पाहिजे .
➡️कोतवालाना तलाठी व महसूल पदामध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे .
➡️ कोतवालांना अनुकंपा नोकर भरती मिळालीच पाहिजे.
➡️ निवृत्त कोतवालांना निर्वाह भत्ता मिळालाच पाहिजे असे .
➡️ कोतवाल यांना पेन्शन मिळाली पाहिजे.
➡️कोतवाल पदनाम महसूल सेवक करणे.
या आंदोलन यशस्वी होण्यासाठी विठ्ठल गुरव, कृष्णा शिंदे अनिल जाधव, मलिनाथ बाळगी राहुल तोडकरी, प्रविणकुमार बाबर, भगवान पारशी, गोरख ढोबळे, प्रलहाद खरे, अवधुत पुजारी, भागवंत चंदनशिवे, प्रवीण गुजले , नवनाथ इंगोले, बदेनवाज डफेदार संजय कुरवडे उमेश क्षिरसागर, अर्जुन सनके, शहाजी हुलगे राजु साठे*
जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी *धानया हिरेमठ, गौतम ठोकळे इरणा कांबळे, देवा सावंत अनिल भोसले*, समाधान सुरयंगध, दत्ता कदम, शिवानंद कोळी, श्रीशैल हकके, रशीद शेख, सुदर्शन गुरव, सय्यद, सुरेश रामपुरे, रेवणसिधद सुतार, सुनील मुलगे स्वामीनाथ आलुरे, शिवशरण कोळी जगदीश देसाई मलपा कोळी हमीद शेख पिटु चव्हाण, पांडुरंग वाघमारे, कृष्णा इंगळे, कृष्णा लोखंडे महादेव खिलारे,
हनुमंत पिसे,मल्हारी देवकाते,विश्वास बनकर,याकूब शेख,सुनील ठोंबरे,नवनाथ गेजगे इतर कोतवाल महिला कोतवाल कर्मचारी सुलोचना देशमुख गुरुदेवी चौधरी रेणुका कुंभार, सुचिता काळे ममता कोळी अबुबाई चव्हाण, वनिता कुंभार लक्ष्मी लाड कविता चव्हाण दिपाली स्वामी अश्विनी गायकवाड सरोजिनी कोळी ऐश्वर्या कांबळे रेशमा वाघमारे ,सुलोचना अदलिगे मनिषा शिंदे यासह इतर महिला कोतवाल कर्मचारी या अदोलन मध्ये सहभागी आहेत.आज एक दिवशी अदोलन सोलापूर येथे जिल्हा परिषद पुनम गेट येथे संपन्न झाला*....
या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी सहभागी झाले होते... यावेळी महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, चतुर्थी श्रेणी संघटना मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद संघटना कृती समिती सोलापूर विविध संघटना जाहीर पाठिंबा दिला आहे... यावेळी शतुन गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना, अशोक इंदापुरे मध्यवर्ती महाराष्ट्र राज्य संघटना, , गजानन गायकवाड महसूल कर्मचारी संघटना कार्य अध्यक्ष, महेश बनसोडे इतर पदाधिकारी जाहीर पाठिंबा दिला.. विठ्ठल गुरव जिल्हाध्यक्ष सोलापूर याचा नेतृत्व आज एक दिवशी अदोलन झाले आहे.