बदलापूर घटनेचा पंढरपूर शहर व तालुका पत्रकारांच्या वतीने निषेध

माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

बदलापूर घटनेचा पंढरपूर शहर व तालुका पत्रकारांच्या वतीने निषेध

बदलापूर घटनेचा पंढरपूर शहर व तालुका पत्रकारांच्या वतीने निषेध

महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा वापरल्या बद्दल बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

मुंबई बदलापूर येथील शाळेतील लहान ३ ते ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची निंदणीय घटना बदलापूर येथे घडली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. महिला पत्रकारांनी बातमी छापली म्हणून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सदर महिला पत्रकारास दमदाटी व अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल या विकृत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत बदलापूर घटनेचा पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला.यावेळी हरिभाऊ प्रक्षाळे, शिवाजी शिंदे, नवनाथ पोरे, मंदार लोहकरे, रामभाऊ सरवदे ,विकास पवार, डॉ राजेश फडे ,आदी पत्रकारांसह पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सदर घडलेल्या घटनेची फिर्याद सुध्दा दाखल करणेस संबंधीत पोलीस ठाण्यातील पोलिसांनी वेळ लावला. या संपुर्ण घटनेची बातमी एका बदलापूर मुंबई येथील सकाळच्या महिला पत्रकारांनी बातमी छापली म्हणून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकारास दमदाटी देवून अर्वाच्च भाषा वापरली की, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे. अशी अशोभणीय म्हात्रे बोलले अशा विकृत वृत्तीच्या वक्तव्यामुळे महिला पत्रकारास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हा एक प्रकारे विनयभंगच असून या विकृतीधा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.