माझ्या मुलाचा श्री विठ्ठलाचा अभिषेक घालताना व्हायरल झालेला व्हिडिओ  प्रक्षाळपूजे दिवशीचा.

व्हिडीओ चित्रिकरण करून समाजमाध्यमात व्हायरल होणे अपेक्षित नाही

माझ्या मुलाचा श्री विठ्ठलाचा अभिषेक घालताना व्हायरल झालेला व्हिडिओ  प्रक्षाळपूजे दिवशीचा.

माझ्या मुलाचा श्री विठ्ठलाचा अभिषेक घालताना व्हायरल झालेला व्हिडिओ  प्रक्षाळपूजे दिवशीचा.

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पंढरपूर (दि.30) :- कार्यकारी अधिकारी श्री.शेळके यांच्या मुलाचा श्री.विठ्ठलाचा अभिषेक करतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांत सध्या व्हायरल झाला आहे. त्या अनुषंगाने खुलासा करण्यात येतो की, प्रतिवर्षीप्रमाणे दि.29/06/2023 रोजी आषाढी एकादशी संपन्न झाली. या यात्रा कालावधीत कार्यकारी अधिकारी म्हणून मला श्रीं.रूक्मिणीमातेची प्रक्षाळपुजा सहकुटुंब करण्याची सेवा मंदिर समितीचे मा.सह अध्यक्ष व सर्व सदस्य महोदयांनी दिली होती. त्यानुसार दि.07/07/2023 रोजी सदरची प्रक्षाळपुजा विधिवत संपन्न झाली.

सदरचा व्हिडीओ हा दि.07/07/2023 रोजीच्या प्रक्षाळपूजेचा असून, त्यादिवशी मला श्री.रूक्मिणीमातेची प्रक्षाळपुजा देण्यात आली होती. त्यावेळी माझ्या मुलाने पुजा सुरू असताना, श्री.विठ्ठल गाभा-यामध्ये श्रींचा अभिषेक केला आहे. तो करताना सोहळे नेसून, पावित्र्य जपले आहे. मात्र, त्याचे व्हिडीओ चित्रिकरण करून समाजमाध्यमात व्हायरल होणे अपेक्षित नाही. सदरच्या व्हिडीओची परिपूर्ण माहिती घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात येईल. 

सदरची पुजा सर्व पावित्र्य जपून पार पाडण्यात आली आहे. तथापि, अशी घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच या घडलेल्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा हेतू नाही. सदरच्या व्हिडीओमुळे श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेचे भाविक-भक्त, वारकरी, वारकरी संप्रदाय यांच्या भावना दुखावल्या असतील तर, त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.

स्वा/-

(राजेंद्र शेळके)

कार्यकारी अधिकारी