भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त
रॅलीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम उपविभागीय पोलीस श्री विक्रम कदम हे सहभागी
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्
पंढरपूर पोलिसांची हर घर तिरंगा जनजागृती भव्य रॅली.
पंढरपूर दिनांक 11 ऑगस्ट ..तिरंगा राष्ट्रध्वज रॅलीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम उपविभागीय पोलीस श्री विक्रम कदम हे सहभागी होते.
आज गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी आज रक्षाबंधन हा पवित्र दिवस असल्याने येथील पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी त्याचबरोबर होमगार्ड यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता.
या राष्ट्रध्वज तिरंगा जनजागृती रॅली ची सुरुवात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे पासून सुरुवात केली होती. रॅली मध्ये पोलिसांच्या चार चाकी वाहन गाड्यावर तिरंगा राष्ट्रध्वज बांधण्यात आले होते. पोलीस व्हॅन गाडीच्या स्पीकरवर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. त्याचबरोबर रॅलीमध्ये सहभागी असणारे सर्व पुरुष व महिला पोलीस वंदे मातरम ,भारत माता की जय ,याच्या घोषणा देत होते. ही तिरंगा राष्ट्रध्वजाची रॅली जनजागृती रॅली म्हणून पोलिसांनी काढली होती.
ही रॅली तेथून पुढे जुना कराड नाका ,नवीन कराड नाका, क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून पुढे के बी पी कॉलेज वरून सरगम चौक, अर्बन बँक, भादुले चौक, नाथ चौक, महाद्वार येथून पुढे कालिका देवी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी तिरंगा राष्ट्रध्वज जनजागृती रॅलीचा शेवट करण्यात आला. त्या ठिकाणी पोलीस आमलदार यांनी भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव तिरंगा राष्ट्रीय ध्वज हर घर तिरंगा याचे पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन हर घर तिरंगा राष्ट्रध्वज यामध्ये सर्व जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.