भाजपाने सोलापूर लोकसभेसाठी मा. मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना संधी द्यावी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील मागणी करणार
भाजपाने सोलापूर लोकसभेसाठी मा. मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना संधी द्यावी. नितीन काळे भाजपा उपाध्यक्ष
भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भविआघाडी नितीन काळे यांनी मागणी केली आहे.
आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांचा दांडगा अनुभव व जनसंपर्क असल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीनेलोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भ वि आघाडी नितीन काळे यांनी केली आहे.. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे या मतदारसंघात संघात भारतीय जनता पक्षाचे चांगले वर्चस्व आहे.. बहुजन रयत परीषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बहुजन रयत परीषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राभर जाळे निर्माण केले आहे. त्याचाच भाग म्हणून लक्ष्मणराव ढोबळे हे मुळचे मंगळवेढा तालुक्यातील असल्याने त्यांनी सोलापूर जिल्ह्यात देखील गावागावात बहुजन रयत परीषदेच्या माध्यमातून खुप मोठ्या प्रमाणात जनसंपर्क कार्य केले आहे.. भारतीय जनता पार्टीत मा. ढोबळे सर यांनी पक्ष प्रवेश केल्यापासून पुर्ण वेळ सर काम करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी मेहनत घेत आहेत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांचे विचार व योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी खुप मोठे प्रयत्न केले आहेत आणि आज ही करत आहेत. त्यांचा राजकीय अनुभव देखील खूप मोठा आहे लक्ष्मणराव ढोबळे यांना संपुर्ण महाराष्ट्र सर या नावाने ओळखतो त्यांची राजकीय दृष्ट्या काम करण्याची वेगळीच पद्धत व जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ही खुप वेगळी भूमिका असते त्यामुळे सामान्य जनतेला न्याय हा सर मिळवून देतात. या अगोदर त्यानी सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केल्याने त्यांचा जनसंपर्क देखील खूप मोठा आहे. प्रत्येक तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते आज देखील तेवढ्याच ताकदीने काम करीत आहेत.. त्यांचा जनसंपर्क देखील सोलापूर जिल्ह्यात मोठा असल्याने पक्षाला देखील नक्कीच त्यांचा फायदा होईल असेही नितीन काळे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात देखील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज गोरगरीब सामान्य कुटुंबातील मुले मुली आज शिक्षण घेऊन उच्च पदांवर कार्यरत आहेत . त्यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून विधानसभेत सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला आहे तर अनेक खात्याचे मंत्री पद देखील भोगले आहे एवढेच नाही तर दोन वेळा लोकसभा निवडणूक देखील लढविली अगदी निसटता पराभव निवडणुकीत झाला होता त्यामुळे सरांना दांडगा अनुभव देखील आहे सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणारा नेता म्हणून सरांना ओळखले जाते.यामुळे सरांचे कार्य हे कौतुकास्पद असुन त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी अशी मागणी नितीन काळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे मी एक कार्यकर्ता म्हणून ढोबळे सरांचे राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या कामाची कार्य मी जवळून पाहिली असल्याने व त्यांची पक्षा बद्दल असलेली खुप मोठी तळमळ मी जवळून पाहिली आहे असेही नितीन काळे यांनी सांगितले. नितीन काळे हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील मागणी करणार असल्याचे शेवटी सांगितले.



