भटुंबरे ग्रामपंचायतीत सविधान दिन साजरा

संविधानाचे पूजन रमाई माता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ नंदिनी प्रक्षाळे यांच्या हस्ते

भटुंबरे ग्रामपंचायतीत सविधान दिन साजरा

भटुंबरे ग्रामपंचायतीत सविधान दिन साजरा.

पंढरपूर शेजारील भटुंबरे गावातील ग्रामपंचायतीने ग्रामसेवक सौ .उघडे_ गायकवाड. सरपंच मंडाबाई ढवळे माझी सरपंच फनचीराम शिंदे. समाधान ढवळे . भीमराव शिंदे रमाई महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ नंदिनी प्रक्षाळे. सौ. स्वाती ढवळे .आरोग्य सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थिती भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला आहे.

भटुंबरे ग्रामपंचायत कार्यालयामधील बैठक हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन रमाई माता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ नंदिनी प्रक्षाळे यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच व ग्रामसेवक तसेच नागरिकांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाचे महत्त्व पटवून दिले तसेच उपस्थित सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ आणि महिला बचत गटाच्या अध्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना भारतीय राज्यघटनेची उद्देशिका वाचून दाखवली व त्यानंतर सदर उद्देशिकेचे सर्वांनी सामूहिक वाचन केले

यावेळी संविधान दिनाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले याप्रसंगी सरपंच ग्रामसेवक यांच्यासह महिला बचत गटाच्या अध्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते.