बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जयंतीनिमित्त पंढरपूर येथे रुग्णांना फळे वाटप*

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त

बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जयंतीनिमित्त पंढरपूर येथे रुग्णांना फळे वाटप*

बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जयंतीनिमित्त पंढरपूर येथे रुग्णांना फळे वाटप*पंढरपूर दी.25 महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त दिनांक 25 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

           यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे म्हणाले की बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे हे आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले. त्यांची भूमिका व्यापक होती व ते दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा दबदबा होता. रिपब्लिकन चळवळ गावागावात पोहचविण्याचा आज आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे. यावेळी पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष समाधान कांबळे, जिल्हा युवक अध्यक्ष अशोक रणदिवे ,पंढरपूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, पंढरपुर चे सामाजिक कार्यकर्ते भारतभाऊ माने, महिला आघाडीच्या नेत्या नाजूकाताई लोखंडे, प्रभावती गायकवाड, मंगल कांबळे, मंगळवेढा शहर अध्यक्ष राहुल लोखंडे, मोहोळ तालुका अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         पक्षाने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी पंढरपूर तालुका अध्यक्ष लक्ष्मणतात्या वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले.