प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी 

शहरात गाडीवर प्रेस लिहिलेली दुचाकी, चार चाकी वाहने

प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी 

प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी 

पंढरपूर शहरात विविध ठिकाणहून चार चाकी, दुचाकी वाहने दाखल होत असतात यामध्ये प्रेस लिहिलेली वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. याचा वापर काही समाजकंटक लोक अवैद्य व्यवसायासाठी करू नयेत यासाठी प्रेस लिहिलेल्या वाहनांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांना देण्यात आले. 

यावेळी पंढरपूर शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. 

या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की पंढरपूर शहरात गाडीवर प्रेस लिहिलेली दुचाकी, चार चाकी वाहने दिसत आहेत. यामध्ये काही समाजकंटक लोक आपल्या वाहनांवर अधिकृत पत्रकार नसतानाही प्रेस लिहून याचा वापर अवैद्य व्यवसायासाठी करत असल्याचे अनेक वेळा दिसून आली आहे. तरी आशा प्रेस लिहिलेल्या वाहनांची चौकशी करून सदर व्यक्ती पत्रकार आहे का? याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर येथील सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्यावतीने करण्यात आली आहे.