पंढरपूर तालुक्यातील ४ टी.बी. मुक्त ग्रामपंचायत गौरव पुरस्कार
महात्मा गांधीजींचा कास्य धातुचा अर्ध पुतळा, प्रशस्तीपत्रक
पंढरपूर तालुक्यातील ४ टी.बी. मुक्त ग्रामपंचायत गौरव पुरस्कार
आज दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७७ वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील मौजे तारापूर, बिटरगाव, भटूबरे आणि मुंढेवाडी ही चार गावे क्षयरोग (T.B.) मुक्त झाल्याने त्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व त्या संबधित प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविका यांचा सत्कार कार्यक्रम मा. श्री. सचिन इथापे साहेब उपविभागीय अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करून या कार्यक्रमास श्री. सचिन लंगुटे तहसीलदार, पंढरपूर, मा. श्री. सुशिल संसारे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर, मा. डॉ. श्री. महेश सुडके वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर, हे उपस्थित होते.. या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर यांनी केले. . श्री. सचिन इथापे साहेब उपविभागीय अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांचे हस्ते टी.बी. मुक्त ग्रामपंचायतीस महात्मा गांधीजींचा कास्य धातुचा अर्ध पुतळा, प्रशस्तीपत्रक व पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले. सध्या आपल्या देशात १४०० लोक दररोज क्षयरोग (T.B.) या रोगाने मृत्यूमुखी पावतात. पंढरपूर तालुक्यामध्ये एकूण ३०५ क्षयरुग्ण उपचार घेत असून ६ रुग्ण औषधास दाद न देणारे जंतूचे क्षयरुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती डॉ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर यांनी दिली.
दर १००० लोकसंख्येमागे ३० संशयित क्षयरुग्ण शोधणे, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ० किंवा १ क्षयरुग्ण सापडणे, क्षयरुग्णाने पूर्ण उपचार घेणे, क्षयरुग्णास शासनाने दरमहा उपचार सुरु असेपर्यंत दरमहा रु. ५००/- आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची आधुनिक मशीनवर थुंकीची तपासणी झालेली असणे, क्षयरुग्णास निक्षय मित्र म्हणून फूड बास्केटची मदत मिळणे या सर्व निकषावर आधरित सर्वेक्षण, तपासणी आरोग्य विभाग, पंचायत समिती, पंढरपूर द्वारे पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले होते आणि संबधित ग्रामपंचायतीनी प्रस्ताव सादर करून त्याची पडताळणी जिल्हास्तरीय समिती द्वारे केली असून वरील सर्व निकषांच्या आधारे पंढरपूर तालुक्यातील एकूण ४ ग्रामपंचायतींची टी.बी. मुक्त ग्रामपंचायत म्हणून गौरव करण्यात आला आहे. हा उपक्रम दरवर्षी चालणार असून प्रथम वर्षी प्रशस्तीपत्रक ,महात्मा गांधीजींचा कास्य धातुचा अर्ध पुतळा द्वितीय वर्षी प्रशस्तीपत्रक ,महात्मा गांधीजींचा रजत धातुचा अर्ध पुतळा व तृतीय वर्षी प्रशस्तीपत्रक ,महात्मा गांधीजींचा सुवर्ण धातुचा अर्ध पुतळा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत यांनी यावर्षी आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने वरील निकषाचे पालन करून आपली ग्राम पंचायत टी.बी. मुक्त होईल या करिता नियोजन आणि प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन मा. डॉ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर यांनी केले.टी.बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान यशस्वी करण्यासाठी मा. श्रीम. मनिषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, मा. डॉ. श्री. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. सोलापूर, मा. डॉ. श्री. सुहास माने जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर, यांनी मार्गदर्शन केले असून मा. डॉ. मिनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी सोलापूर यांनी सहकार्य केले.
तसेच क्षयरोग हा ६ महिने उपचार घेतल्याने पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर्व शासकीय रुग्णालयामध्ये निदान, तपासणी, आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत आहे. तसेच क्षय रुग्णांची थुंकी तपासणी करणे करिता उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे आधुनिक थुंकी तपासणी मशीन (CBNAAT) देखील उपलब्ध आहे. त्यामुळे लवकर निदान लवकर उपचार यामुळे आपण क्षयरोगावर मात करू शकतो अशी माहिती डॉ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर यांनी दिली. श्री. सचिन इथापे उपविभागीय अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने दुर्लक्ष केल्यास तो बळावू शकतो म्हणून योग्य उपचार घेणे गरजेचे असल्याने व २०२५ पर्यंत टी.बी. मुक्त भारत करण्यासाठी मा.प्रधानमंत्री यांनी *टीबी हारेगा देश जितेगा* या स्लोगन अंतर्गत प्रयत्न करणे आवश्यक असून गरजेचे आहे असे सांगितले. टी.बी. मुक्त ग्राम पंचायत करण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागास आवश्यक मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन मा. श्री. सुशिल संसारे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर यांनी दिले. कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे श्री. महेश वैद्य , वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, पंढरपूर यांनी आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमास श्री. प्रमोद जावळे विस्तार अधिकारी (आरोग्य) , श्री. अरुण महाजन (आरोग्य सेवक), श्री. योगिनाथ विजापुरे (टी.बी.एच.व्ही), श्री. शकील शेख (एस.टी.एस.) श्री.अभिजित बाजारे (तालुका आशा समूह संघटक) श्री. महेश जमदाडे आणि सबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होते.