लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान महत्त्वाचे

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान महत्त्वाचे

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान महत्त्वाचे

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान महत्त्वाचे

-प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर (दि.25):-लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येक नागरिकाने उत्साहात मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले.

     राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी 2023

राष्ट्रीय मतदार दिवस तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे साजरा करण्यात आला.यावेळी अपर तहसीलदार समाधान घुटुकडे, नायब तहसिलदार पी.के. कोळी, निवडणूक विभागाचे आर. आर.शिंदे महसूल सहायक, उमेश भोसले,निवडणूक अधिकारी कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

    यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले,जास्तीत जास्त लोकांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत असून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा.

मतदानाबाबत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना प्रोत्साहन देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. तसेच युवा मतदारांसाठी महाविद्यालयात नोंदणी शिबिर घेण्यात आली असून, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी युवकांनी मतदानाची प्रक्रिया समजावून घेणे आवश्यक आहे.

सशक्त लोकशाहीसाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदार कार्डाचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणीत उत्तम कामगिरी करणाऱ्या बीएलओ, मतदान अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली.

 यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव,अपर तहसीलदार समाधान घुटुकडे यांच्या हस्ते 

मतदार जनजागृती 

 रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही रॅली तहसील कार्यालय ते आंबेडकर चौक , सावरकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी शिक्षक यांनी सहभाग घेतला होता.