आढीव सह विविध गावांत गावबंदी साखळी उपोषण सुरू

आढीवगाव सह, रोपळे, बाभळगाव, शेगाव दुमाला, गावांमध्ये

आढीव सह विविध गावांत गावबंदी साखळी उपोषण सुरू

आढीव सह विविध गावांत गावबंदी साखळी उपोषण सुरू

वृत्तसेवा,आढीव :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास आढीवगाव सह, रोपळे, बाभळगाव, शेगाव दुमाला, गावांमध्ये मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून. राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदीच्या बॅनर लावत राजकीय पुढाऱ्यांचा निषेध व्यक्त करून आढीव येथे आज ता.२६ सकाळी संभाजी ब्रिगेड कार्यालय येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली.मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असल्याने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे या हेतूने गेले काही दिवस जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवाली या ठिकाणी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन महाराष्ट्र भर गाजले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आश्वासनानंतर अन्नत्याग ऐवजी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून आढीव व आसपासच्या गावातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण व मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालू ठेवू असे हे.भ.प. शंकर महाराज चव्हाण यांनी सांगितले.या साखळी उपोषणास मराठा समाज बांधवांनी व इतर समाजाच्या संघटनांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला. या साखळी उपोषणास उप सरपंच द्रोणाचार्य चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष सुधन्वा पाटील,वामन चव्हाण, चांगदेव वाघ, रमेश चव्हाण,मा . सरपंच दत्तात्रय चव्हाण, शेतकरी संघटनेचे सोमनाथ घोगरे, सिद्धनाथ पवार,दादासाहेब चव्हाण, उमेश जाधव, नजीर पटवेकरी, चंद्रकांत महाडिक, रविराज चव्हाण, नितीन चव्हाण, रोहित मोरे, विलास कांबळे, सोमनाथ गोरे, महादेव पवार,महेश चव्हाण, किरण सुरवसे, गणपत नाटीळक, सुभाष साठे,सिद्धू सुरवसे, प्रसाद वाघ, आबासो चव्हाण, बबन चव्हाण, रमेश चव्हाण, सुभाष साठे, सुरेश चव्हाण, औदुंबर चव्हाण, संजय चव्हाण, माणिक महाडिक, अमित पवार, सिद्धू थोरात, सुभाष देशमुख, आदी साखळी उपोषण करते उपस्थित होते.