पंढरपूर शहरात 89 सार्वजनिक गणेश मंडळे

पर्यावरण पुरक मंडळांना मिळणार बक्षिसे; कायदा सुवव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

पंढरपूर शहरात 89 सार्वजनिक गणेश मंडळे

पंढरपूर शहरात 89 सार्वजनिक गणेश मंडळ

पर्यावरण पुरक मंडळांना मिळणार बक्षिसे; कायदा सुवव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

पंढरपूर : भारतीय संस्कृतीमधील गणेशोत्सव हा सण महत्वाचा आहे. या गणेशोत्सव पर्यावरण पुरक पध्दतीने साजरा करण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील 89 गणेश मंडळांनी पर्यावरण गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. तर नगरपालिकेच्यावतीने पुर्यावरण पुरक गणेश मंडळांना बक्षिसे देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगीतले.

गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माळी बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आदी उपस्थित होते.  

 पुढे बोलताना माळी म्हणाले की, पंढरपूर शहरात 89 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. तर आतापर्यंत 84 मंडळांना विनाशुल्क परवाना देण्यात आला आहे. पर्यावरण पुरक गशेशोत्सव साजरा करणार्‍या गणेश मंडळांना नगरपरिेदेच्यावतीने बक्षिसे देवून गौरवण्यात येणार आहे. याकरीता नगरपालिकेची टिम गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटुी देवून पाहणी करणार आहेत. यात पर्यावरणाची जनजागृती, पर्यावरण पुरक वातावरणनिर्मिती तसेच पर्यावरण पुरक असलेल्या गोष्टींचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. 100 गुण असणार आहेत. यात जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारे तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. यात प्रथम क्रमांकास 5 हजार रुपये, व्दितीय क्रमांकास 3 हजार रुपये व तृतीय क्रमांकास 2 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहेत. तसेच गणेश मुर्ती संकलनासाठी नगरपरिषदेच्यावतीने शहरात व नदीपात्रात असे मिळून 11 ठिकाणी तात्पुरती संकलन केंद्र उभारण्यात येत आहेत. पाचव्या दिवसापासून मुर्ती संकलन करण्यात येणार आहे. तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी नगरपालिकेने व्यवस्था केली आहे. नागरिकांनी निर्माल्य संकलन केंद्रावरच तेसच नगरपालिकेच्या येणार्‍या वाहनाकडेच निर्माल्या द्यावे. याकरीता नागरिकांनी सहकार्य करावे. रस्त्यावर गणेश मंडळांनी मंडप, स्टेज उभारताना खड्डे पाडू नयेत. खड्े पाडून मंडप उभारल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही माळी यांनी सांगीतले.  

उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम म्हणाले की, पंढरपूर विभागात 385 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. तर 16 गावांमध्ये 1 गाव 1 गणपती संकल्पना राबवली जात आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून गणेश मंडळे, मुर्तीकार आदींच्या वेळोवेळी बैठका घेत समाजात अशांतता निर्माण होईल, असे देखावे सादर करु नयेत. तसेच फ्लेक्स, बोर्ड अपेपार्ह लावू नयेत. अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी लोकांची यादी बनवण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर तात्पुरती हद्दपारी, स्थानबद्दता करण्यात येत आहे. यामध्ये 279 जणांना तात्पुरते स्थानबध्द करण्यात आले आहे. तर तर दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेले दारु विक्रेते आदीं दोनशेहून अधिक जणांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. तर 17 जणांना सीआरपीसी 92 नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. तर कलम 144 नुसार 170 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच गणेश मंडळांना डॉल्बीचा आवाज 75 डिसीबलपेक्षा जास्त सोडू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. गणेशोत्सव काळात 100 पेक्षा जास्त स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे. त्ययाचबरोबर शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 5 सार्वजिनक मंहळांना बक्षिस देण्यात येणार असल्याचेही विक्रम कदम यांनी सांगीतले.