आषाढी यात्रे पूर्वी वारकरी भाविकांना सुविधा देण्याची कामे पूर्ण करणार. डॉ. प्रशांत जाधव.

साप्ताहिक साई सम्राट युट्युब न्यूज चैनलचा इम्पॅक्ट.

आषाढी यात्रे पूर्वी वारकरी भाविकांना सुविधा देण्याची कामे पूर्ण करणार. डॉ. प्रशांत जाधव.

पंढरपूर येथील 65 एकरात आषाढी यात्रा अगोदर कामे सुरू

साप्ताहिक साई सम्राट युट्युब न्यूज चैनलचा इम्पॅक्ट.

आषाढी यात्रे पूर्वी वारकरी भाविकांना सुविधा देण्याची कामे पूर्ण करणार. डॉ. प्रशांत जाधव.

पंढरपूर येणाऱ्या आषाढी यात्रा पार्श्वभूमीवर येथील 65 एकरातील पहिल्या पावसावेळीच आमच्या साई सम्राट साप्ताहिक व युट्युब न्यूज चैनल मध्ये वारकरी भाविकांना सुविधा अभावी 65 एकरातील काही त्रुटी संदर्भात नगरपरिषद व प्रशासनाच्या प्रसिद्धी माध्यमातून समोर आणले होते. आमच्या साप्ताहिक साई सम्राट व युट्युब न्यूज चैनल बातमीचा इम्पॅक्ट म्हणून नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासनाने तात्काळ दखल घेत कालपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे.

65 एकरातील रस्त्यावर येणारे पाणी असेल अथवा काटेरी झुडपे गवत असेल तसेच असणारे खड्डे त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे या ठिकाणी मुरूम टाकण्याचे नियोजन करण्यात आले असून ही सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करणार असून होणारी कामे सर्व चांगल्या प्रकारची करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारला देण्यात आल्या असल्याचे पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ .प्रशांत जाधव यांनी सांगितले.

सध्या पंढरपूर येथील विविध प्रशासन कार्यालयामध्ये पंढरपूर प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी तसेच तालुका व ग्रामीण पोलीस अधिकारी हे सर्व येणाऱ्या आषाढी वारीला पंढरपुरात नवीन अधिकारी आहेत. परंतु पंढरपूर आषाढी यात्रा ही सर्वात मोठी वारी असल्याने संबंधित अधिकाऱ्यावर मोठा ताण तणाव होणार आहे. आषाढी यात्रा ही पावसाळ्यात जुलै महिन्यामध्ये होत असल्याने या यात्रा काळात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो त्यामुळे वारकरी भाविकांच्या सुविधा या संदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जातीने लक्ष घातले असून तशा सूचनाही विविध प्रशासन अधिकारी यांना दिल्या आहेत.