अनिल नगर भागात भर रस्त्यावर पत्रा शेड मारून अतिक्रमण

रस्त्यावरून आषाढी कार्तिकी अन्य छोट्या चार यात्रा वेळी या रस्त्याचा वापर वारकरी भाविक भक्त मठातील शहरातून नदीकडे स्नानासाठी जाण्यासाठी नेहमीच वापर करतात

अनिल नगर भागात भर रस्त्यावर पत्रा शेड मारून अतिक्रमण

अनिल नगर भागात भर रस्त्यावर पत्रा शेड मारून अतिक्रम

 न. पा. च्या अधिकाऱ्यांची दुर्लक्ष

पंढरपूर शनिवार दि..8 ऑक्टोंबर पंढरपूर शहरातील अनिल नगर येथील चंद्रभागा नदीकडे जाणारा रस्ता उपजिल्हा रुग्णालयाच्या पश्चिमेस हा रस्ता नगर परिषदेच्या अंतर्गत व नकाशात असून या रस्त्याची रुंदी साधारण 40 फूट आहे. या रस्त्यावरून आषाढी कार्तिकी अन्य छोट्या चार यात्रा वेळी या रस्त्याचा वापर वारकरी भाविक भक्त मठातील शहरातून नदीकडे स्नानासाठी जाण्यासाठी नेहमीच वापर करतात या रस्त्यावर महिन्याच्या एकादशीला ही गर्दी राहते .

स्वर्गीय श्रीमंत सुधाकर पंत परिचारक यांनी या रस्त्याचे सन2016ते2018 मध्ये या 40 फूट असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्या नंतर हा रस्ता पुन्हा चर्चेत येऊन नगरपालिकेने डांबरीकरण करण्याचे बैठकीमध्ये ठरवले होते. परंतु रस्ता मात्र आजपर्यंत झाला नाही. स्थानिक नागरिकांनी विचारल्यानंतर या रस्त्याची माहिती मिळते की रस्ता मंजूर आहे आणि होणार आहे एवढीच उत्तर अनेका कडून ऐकण्यास मिळतात. याच रस्त्यावर सध्या अनिल नगर मध्ये बाहेर गावावरून राहण्यास आलेले लोक भरस्त्यावरच भले मोठे पत्रा शेड मारून वास्तव्य करू लागले आहेत परंतु याकडे मात्र नगर परिषदेच्या प्रभागातील नगरसेवकाचे किंवा नगर परिषदेच्या एकाही अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही. बाहेर गावातील अनेक लोकांनी या अनिल नगर परिसरामध्ये रिकामी जागा दिसेल तिथे पत्रा शेड उभारून राहत आहेत. त्यामुळे अनेकांना खात्री झाली आहे की नगरपरिषद अधिकारी कर्मचारी किंवा नगरसेवक याकडे कोणीही लक्ष देत नाहीत त्यामुळे आपण कोठेही नगरपालिकेच्या जागेत पत्रा शेड मारू शकतो आणि राहू शकतो असे समजून सध्या अनेक जण अनिल नगर मध्ये नगर परिषदेच्या जागेत आणि भर रस्त्यावर अतिक्रमण करून राहिले आहेत. नगरपरिषदेला तक्रारी देऊन याकडे कोणी लक्ष देत नाहीत हे मात्र दुर्दैवी आहे. नगरपरिषदेची शाळा नंबर चार च्या शेजारी नगर परिषदेचा अधिकृत प्लॅनमध्ये रस्ता असूनही त्या ठिकाणी लोकांनी भरस्त्यावरच अतिक्रमण केले आहे तेव्हा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी या अतिक्रमणे काढण्याच्या बाबतीत जर दुर्लक्ष केले तर जिल्हाधिकारी नगर अभियंता आयुक्त यांना तक्रारी देऊन या प्रकरणी लवकरच आंदोलन उपोषण करण्याचा इशारा विविध संघटनेने दिला आहे.