पंढरपूर जिल्हा रुग्णालय स्वच्छता कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णाचा भोंगळ कारभार थांबणार का?.

पंढरपूर जिल्हा रुग्णालय स्वच्छता कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कामगारांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णाचा भोंगळ कारभार थांबणार का?.

पंढरपूर दिनांक 3 जुलै. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एन आर एच एम प्रोजेक्ट योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आया.कूक.स्पोर्ट स्टाफ वाचमन. कामगारांना दिल्या 11 महिन्यापासून एक दमडा नाही पगार न दिल्याने हे आठ कर्मचारी सोमवार दिनांक ४ जुलै रोजी सोलापूर जिल्हाधिकार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करणार आहेत.

 आषाढी यात्रा काळात म्हणजे दिनांक ५ जुलैपासून पुन्हा हे कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी दिलीआहे. या आठ कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांनी सन 20१८/१९ आणि आणि २०२१ परींच्या पुनर्नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. या आठ कर्मचाऱ्यांना स्पोर्ट स्टॉफ.वाचमन. कूक . आया. आटेनडेट.ऐवजी कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या लोकांचे प्रेत उचलण्याचे काम ही आम्ही केले आहे. परंतु या कर्मचाऱ्यांकडे अधिक जास्त पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा झाला आहे म्हणून गेली 11 महिन्यापासून या आठ कर्मचाऱ्यांना कसलेही वेतन दिले नाही.

 त्यामुळे स्वतः उपाशी राहून आणि कौटुंबिक अडचणीचा सामना करत आजपर्यंत या कर्मचाऱ्यांनी काम चालू ठेवले होते परंतु या कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडे पूर्णपणे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दुर्लक्ष असल्याने केवळ आम्हाला काम बंद आंदोलन करून आत्मदहन करण्याची आमच्यावर वेळ आली असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. सोलापूर कार्यालयातील वेतन क्लार्क यांच्या चुका आमच्यावर लादून आमचा पूर्ण पगार कपात करून घेतला आहे. जरी आमच्याकडे शासनाचे अधिक वेतन रक्कम आली असली तरी आमची त्यांनी 60 टक्के रक्कम कपात करून घ्यावी व उर्वरित 40 टक्के रक्कम आम्हाला येत्या चार दिवसात द्यावी अन्यथा आम्ही आमच्या निर्णयावर सर्वजण ठाम आहोत असे शेवटी त्यांनी सांगितले.