पत्नीचे शिर घेऊन हिंडणारा माथेफिरू कमलापूर येथे पतीनेच धडावेगळे केले पत्नीचे शीर

पत्नीचे शिर घेऊन हिंडणारा माथेफिरू कमलापूर येथे पतीनेच धडावेगळे केले पत्नीचे शीर

पत्नीचे शिर घेऊन हिंडणारा माथेफिरू कमलापूर येथे पतीनेच धडावेगळे केले पत्नीचे शीर

पत्नीचे शिर घेऊन हिंडणारा माथेफिरू कमलापूर येथे पतीनेच धडावेगळे केले पत्नीचे शीर

आरोपीस अटक

 जिंतूर .तालुका पुर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पतीने कोयत्याने आपल्या पत्नीचे शीर धडावेगळे केल्याचा थरार घडला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 

कमलापूर येथे 35 वर्षीय महिलेचा कोयत्याने सपासप वार करून पतीनेच राहत्या घरी खून केल्याची घटना घडली मंगळवारी (दि.29) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. 

घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय रामोड संभाजी शिंदे, संतोष चाटे , गणेश लोंढे, संतोष सोनटक्के, रामकिशन काळे ,दिपक बेंडे, गणेश चनखोरे, हनुमान ढगे , संजय चव्हाण , धनंजय कनके आदी घटनास्थळी दाखल झाले व आरोपींस ताब्यात घेतले. बुधवारी (दि.30) मयत महिलेच्या पतीविरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेचे नाव आशा केशव मोरे वय - 35 रा. कमलापुर असे आहे. आरोपी केशव गोविंद मोरे वय 38यास पोलिसांनी अटक केली आहे. 

मंगळवारी रात्री कुटुंबीय नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री नऊ ते दहाच्या सुमारास शेताला कालव्याचे पाणी देण्याच्या कारणावरून वाद घालून त्याने ऊस तोडण्याच्या लोखंडी धारदार कोयत्याने पत्नीच्या मानेवर, डोक्यात, तोंडावर, चेहर्‍यावर सपासप अनेक वार करून चेंंदामेंदा करून मानेपासून धड वेगळे करून तिला जागीच मारुन टाकले, या आशयाची फिर्याद व्यंकटी गोविंदराव मोरे यांनी दिल्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत आशाबाईचे माहेर डोणगाव गोपाळवाडी (ता.मुदखेड जि. नांदेड) असून तिला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ही घटना चिमुकल्यांच्या समोर घडल्यामुळे ते भेदरलेले आहेत. 

 या घटनेची माहिती ताडकळस पोलिसांना कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे हे घटनास्थळी रात्रीच दाखल झाले . आरोपीला ताब्यात घेऊन परिस्थिती बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच विच्छेदन करण्यासाठी प्रेत परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

   मयत महिलेवर बुधवारी (दि.30) कमलापूर येथे अंत्यविधी करण्यात आले. ठाणेदार विजय रामोड हे तपास करीत असून, सपोनि सय्यद, हानुमान मरगळ रामकिशन काळे, लक्ष्मण कांगणे, वसंत राठोड, लोंढे हे तपासकामी सहकार्य करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटने संदर्भात पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी आज ताडकळस पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली