गुरसाळे टाकळी जवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिलां जागीच ठार.

अंत्यविधीला गेले आणि भीषण अपघातामध्ये जीव गमावला.

गुरसाळे टाकळी जवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिलां जागीच ठार.

गुरसाळे टाकळी जवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिलां जागीच ठार.

त्यातील एक महिला गंभीर जखमी.

 गुरसाळे नजीक पुनर्वसन टाकळी या गावातील भारत गुटाळ यांच्या वयोवृद्ध वडीलाचा मृत्यू झाला होता.

त्यांचा अंत्यविधी उरकून घराकडे परतत असतानाजमावामध्ये ट्रक घुसून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे . तसेच इतर जखमी असणाऱ्या महिलांवर भरपूर आहेत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटना पंढरपूरपासून जवळ असलेल्या टेंभुर्णी रोडवरील टाकळी पुनर्वसन गावानजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.पंढरपूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. सासऱ्याचा अंत्यविधी उरकून घराकडे परत निघालेल्या शोकाकुल महिलांच्या जमावात अचानक भरधाव ट्रक घुसला. यामध्ये महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 महिला जखमी झाल्या. ठार झालेल्या महिला अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्तीच्या सुना आहेत.

ही घटना काल 19 मे रात्री 11/30 वाजता टाकली गुरसाळे येथे घडली आहे. गेनदेव गुटाळ यांचा अंत्यसंस्कार उरकून ते घरी जात होते. अपघातातील मृत 2 महिला गुटाळ यांच्या सुना आहेत.टाकळी गुरसाळे ता.पंढरपूर येथील गेनदेव गुटाळ यांचे शुक्रवारी ता.19/5/2023 रोजी रात्री 7/30 वाजता निधन झाले होते. त्‍यांच्यावर रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल महिला पंढरपूर – टेंभुर्णी रोडच्या बाजूने घराकडे परतत होत्‍या. यावेळी करकंब कडून भरधाव वेगाने येणारा मालट्रक महिलांच्या घोळक्यामध्ये घुसला.

या भीषण अपघातात मृत गुटाळ यांच्या दोन सुना हिराबाई भारत गुटाळ वय 45 वर्षे व मुक्ताबाई गोरख गुटाळ वय 55 वर्षे या ठार झाल्या. तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या. गुरसाळे येथे टाकळी जवळ पंढरपूर-टेंभुर्णी रस्यावर शुक्रवार रात्री 11/30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेचा अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करत आहेत.