आषाढी यात्रा काळात शहरा बाहेरील बस स्थानकापासून पंढरपुरात भाविकांना येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय करावी

वारकरी भाविकांना आर्थिक भुर्दंड होणार नाही

आषाढी यात्रा काळात शहरा बाहेरील बस स्थानकापासून पंढरपुरात भाविकांना येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय करावी

आषाढी यात्रा काळात शहरा बाहेरील बस स्थानकापासून पंढरपुरात भाविकांना येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय करावी वारकरी भाविकांची मागणी.

पंढरपूर आषाढी एकादशी सोहळा येत्या 17 जुलै रोजी संपन्न होणार आहे.वर्षातील ही सर्वात मोठी आषाढी यात्रा पंढरपूर या ठिकाणी भरत असते.या आषाढी यात्रेला महाराष्ट्र राज्यातून व कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने वारकरी भावीक पंढरपूर येथे दाखल होत असतात. आषाढी यात्रा काळात एसटी महामंडळाकडून नेहमीच पंढरपूर शहराच्या बाहेर चार ठिकाणी एसटी बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपाची उभारली जातात. त्यापैकी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनुनगर गुरसाळे, तसेच सांगोला पंढरपूर रोडवर दाते मंगल कार्यालय महावितरण परिसर, सोलापूर रोडवर तांबोळी वस्ती जवळ, अन्य एका ठिकाणी असे एकूण चार व शहरातील नव्याने झालेले चंद्रभागा मैदान येथील एक अशा सर्व बस स्थानकाचा वापर केला जातो.

पंढरपूरला येणारे वारकरी भाविक हे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय जास्तीत जास्त शेतकरी व मोलमजुरी करणार भाविक वर्ग श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा अधिक प्रमाणात आहे. वारकरी भाविक हे त्यांच्या गावापासून म्हणजेच उदा.मराठवाड्यातून किंवा नगर जिल्ह्यातून येणारा असेल तर आता महामंडळाने महिलांना 50 टक्के सूट तर 70 वर्षापुढील पुरुष व महिलांना मोफत एसटी प्रवास केला आहे . भाविक हा 50 टक्के एसटी बस तिकीट देऊन म्हणजे 200 रुपये ऐवजी 100 रुपये देऊन पंढरपूर पर्यंत पोहोचतो परंतु आषाढी यात्रा काळात मात्र एसटी महामंडळाने शहराच्या बाहेर 10किमी अंतरावर बस स्थानक केल्यामुळे गुरसाळे येथील बस स्थानकापासून पंढरपूर शहरात वारकरी भाविकांना एका व्यक्तीस ऑटो रिक्षाने येण्यासाठी 200 रुपये घेतले जातात. सोलापूर रोडवर असणाऱ्या बस स्थानकापासून 100 ते 150 रुपये घेतले जातात. तर सांगोला रोड असणाऱ्या बस स्थानकापासून तेवढेच पैसे घेतले जातात त्यामुळे यात्रा काळात ऑटो रिक्षा चालक वारकरी भाविकांची आर्थिक पिळवणूक करून पैसे घेतले जातात याला कुठेतरी लगाम प्रशासनाने लावला पाहिजे कारण मूळ गावापासून वारकरी भावीक 200 रुपये मध्ये पंढरपूर येथे पोहोचतो परंतु यात्रा काळातील बस स्थानकापासून वारकरी भाविकांना शहरात ऑटोरिक्षाने येण्यासाठी 200 प्रति व्यक्ती दोनशे रुपये द्यावे लागतात ही मोठी बाब आहे. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनासाठी येणाऱ्या गरीब वारकरी भाविकांच्या खिशाला कात्री लागत असून नाहक पैशाचा भुर्दंड सोसावा लागतो हे अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून हा विषय गांभीर्याने घ्यावा. एसटी महामंडळ यांच्याकडून यात्रा काळात बाहेर होणाऱ्या बस स्थानकावर वारकरी भाविकांना पंढरपूर शहरात येण्यासाठी महामंडळाच्या स्वतःच्या बसेस प्रत्येक यात्रा काळात होणाऱ्या बस स्थानकावर 20 बस उपलब्ध करून वारकरी भाविकांना दिल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागणार नाही तसेचत्यांना आर्थिक भुर्दंडही होणार नाही. तरी येणाऱ्या आषाढी यात्रा काळात वरील भाविकांच्या मागणीप्रमाणे वारकरी भाविकांना सुविधा म्हणून सोय करण्यात यावी अशी मागणी वारकरी भाविकातून जोरदार आहे.