पंढरपूर ते देगांव रोडवरील गतीरोधक कमी करण्याची काॅंग्रेसची मागणी

सोलापूर ते मार्गावर देगाव पर्यंत सर्वाधिक जास्त गतिरोधक

पंढरपूर ते देगांव रोडवरील गतीरोधक कमी करण्याची काॅंग्रेसची मागणी

पंढरपूर ते देगांव रोडवरील गतीरोधक कमी करण्याची काॅंग्रेसची मागणी

जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव यांची बांधकाम विभागाकडे तक्रार

पंढरपूर दि .20 जानेवारी भीमा कारखाना ते पंढरपूर नव्यापंढरपूर ते देगांव रोडवरील गतीरोधक कमी करण्याची काॅंग्रेसची मागणीने करण्यात आलेल्या रस्त्यावर देगांव पासून पंढरपूर पर्यंत ७ किमी अंतरावर १७ गतिरोधक बसवण्यात आले आहेत. १०० मीटर अंतरावर १ गतिरोधक असे १७ गतिरोधक बांधकाम विभागाने बसवण्यात आल्याने नागरिकांना गतिरोधकांच्या सामन्याला सामोरे जावे लागत आहे. तसेच गतिरोधक बसवण्यात आलेल्या ठिकाणी पांढ-या पट्या सुध्दा दाखवण्यात आले नसल्याने नागरिकांना गतिरोधक समजत नाहीत. गाड्यांचा स्पीड असेल तर नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

तसेच नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा साईट पट्या सुध्दा केलेल्या नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपे,चिलारी तश्याच आहेत.त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा साईट पट्या केल्या नसल्याने व गतिरोधक जास्तीत जास्त असल्यामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान अपघाताचा सामना करावा लागत आहे.फुलचिंचोली,पुळुज, सुस्ते, तारापूर,खरसोळी, बिटरगांव, पोहोरगांव, देगांव येथील नागरिकांच्या तीव्र मागणीनुसार सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेल विभागाचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.