नगर परिषद, पंढरपूर येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची शाखा स्थापन.

मागासवर्गीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नावर चर्चा

नगर परिषद, पंढरपूर येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची शाखा स्थापन.

नगर परिषद, पंढरपूर येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची शाखा स्थापन.
  पंढरपूर दि.29-10-2023 रोजी स्थापन करण्यात आली.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे यांनी ॲड.किशोर खिलारे यांची अध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या निवडीचे पत्र राज्य कार्याध्यक्ष मा.गणेश मडावी यांच्या हस्ते देऊन नूतन अध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यात राज्य कार्याध्यक्ष मडावी, जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रसाद सोनवणे, सचिन सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मागासवर्गीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
यावेळी महासंघाचे संघटक लक्ष्मण गायकवाड, महसूल शाखेचे प्रसाद सोनवणे, सिव्हिल शाखेचे सचिन सोनवणे तसेच नगर परिषद, पंढरपूरचे किशोर दंदाडे, आकाश बनसोडे, कांबळे, गायकवाड, नाईकनवरे आदी नूतन पदाधिकार उपस्थित होते.