कत्तलखान्याकडे जनावरे घेवून जाणाऱ्या वाहनावर बारामती पोलीसांनी केली कारवाई
ताब्यात घेतलेली जनावरे दयोदय गोशाळेत
कत्तलखान्याकडे जनावरे घेवून जाणाऱ्या वाहनावर बारामती पोलीसांनी केली कारवाई
ताब्यात घेतलेली जनावरे दयोदय गोशाळेत
पुणे - महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू करण्यात आला असला आणि गाय, बैल आजारी किंवा वृद्ध झाल्याचे कारण सांगून जनावरांची कत्तल करता येणार नाही असे असतानाही कत्तलखान्यासाठी त्यांची विक्री वाढली आहे .
असा प्रकार आढळल्यास जनावरांची विक्री करणा-याला किंवा खरेदी करणा-याला तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागणार असा कायदा असतानाही विक्री मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे .
जनावरांची विक्री करून कत्तलखान्यात नेत असताना पोलिसांची कारवाईही होत असते. अशाच एका कारवाईत बारामती तालुक्यात ११ जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. ही कारवाई बारामती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी १०/०५/२०२२ रोजी केली. MH09 CU 8533 या चारचाकी वाहनाने जनावरांना कत्तलखान्यात नेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या वाहनाला अडविले.या वाहनाची तपासणी केली असता, त्यात ११ जनावरे आढळून आली. कत्तलखान्यात जाणार्या ११ गायीं आणि बैलांची सुटका करून मळद ता.बारामती जि.पुणे येथील कुसुम बागेतील दयोदय गोशाळेत आणण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.